बेळगाव : नगरसेवक vs अधिकाऱ्यामध्ये हमरीतुमरी

बेळगाव : नगरसेवक vs अधिकाऱ्यामध्ये हमरीतुमरी

अपशब्द वापरल्याने वादाची स्थिती @महापालिका अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न

ए आणि बी खात्यांतर्गत मिळकतींची नोंद

ई-आस्थीमधील ए व बी खाता नोंदणी मोहीम
इमारतींना पीआयडी क्रमांक देण्याची मागणी आणि वाद
नगरसेवक किल्लेदार व महसूल अधिकारी अनिशेट्टर यांच्यात जोरदार वादावादी
शिवीगाळ करण्यासह अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न
महसूल उपायुक्त रेश्मा तालीकोटी #मध्यस्थी
argument between corporator and revenue officer - Belgaum City Corporation
logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
बेळगाव—belgavkar—belgaum : बेळगाव महापालिकेतील अपक्ष नगरसेवक रियाज किल्लेदार व महसूल अधिकारी संतोष अनिशेट्टर यांच्यात बुधवारी जोरदार हमरीतुमरी झाली. ई-आस्थीमधील ए व बी खाता नोंदणी मोहीम सुरु असलेल्या प्रशासकीय इमारतीमध्ये हा प्रकार घडला. या घटनेमुळे महापालिका कार्यालयात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली.
logo
Pay Quarterly ₹ 15
₹ 15 तीन महिने
घटनेदरम्यान नगरसेवक किल्लेदार यांनी अपशब्द वापरल्याने वाद वाढला. नगरसेवक किल्लेदार यांनी अनिशेट्टर यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला; पण सरकारनियुक्त नगरसेवक डॉ. दिनेश नाशीपुडी तसेच तेथे उपस्थित असलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांनी त्याना रोखले. दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक सुरु होताच महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी त्या ठिकाणी धावले. आयुक्त शुभा बी. आपल्या कक्षात अधिकाऱ्यांची बैठक घेत होत्या. त्यांना हा प्रकार समजताच त्यांनी महसूल उपायुक्त रेश्मा तालीकोटी यांना त्या ठिकाणी पाठविले.
logo
Pay Monthly ₹ 5
₹ 5 एक महिना
रेश्मा तालीकोटी यांनी नगरसेवक किल्लेदार व महसूल अधिकारी अनिशेट्टर यांना प्रशासन उपायुक्त उदयकुमार यांच्या कक्षात जाण्याची विनंती केली. उदयकुमार व रेश्मा तालीकोटो यांनी दोघांसोबत चर्चा केली. वाद कशामुळे झाला याची माहिती घेतली. सुमारे पाऊण तासानंतर वादावर पडदा पडला. मनपाच्या जन्म व मृत्यू दाखले विभागातून परस्पर फाईल उचलणाऱ्या 'त्या' नगरसेवकाने बुधवारी महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत पुन्हा आगळीक करण्याचा प्रयत्न केला. इमारतींना पीआयडी क्रमांक देण्यावरून महसूल अधिकारी अनिशेट्टर यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करण्यासह अर्वाच्च शब्दात शिवीगाळ केली. त्यामुळे महापालिका आवारात काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
विरोधी गटातील एका नगरसेवकाची वागणूक गेल्या काही दिवसांपासून महापालिकेत वादग्रस्त ठरू लागली आहे. अधिकाऱ्यांना अनधिकृतपणे कामे करून देण्यासंदर्भात प्रयत्न सुरु आहे. अलीकडेच त्या नगरसेवकाने जन्म-मृत्यू दाखले विभागातून एक फाईल परस्पर उचलली असल्याने सध्या तो नगरसेवक चर्चेत आहे. याबाबत आरोग्य विभागाचे अधिकारी त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे समजते. त्यातच बुधवारी नगरसेवकाचे आणखी एक नवीन प्रकरण पुढे आले आहे.
महापालिकेत सध्या ए आणि बी खात्यांतर्गत मिळकतींची नोंद करून घेतली जात आहे. त्यामुळे या सर्व प्रक्रियेवर नोडल अधिकारी म्हणून महसूल अधिकारी अनिशेट्टर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी त्या नगरसेवकाने महसूल अधिकारी अनिशेट्टर यांची भेट घेऊन 3 इमारतींना पीआयडी क्रमांक देण्याची मागणी करत कागदपत्रे दिली होती. त्यावर कागदपत्रांची शहानिशा करून पुढील कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन अनिशेट्टर यांनी दिले.

मात्र, बुधवारी सकाळपासूनच नगरसेवकाने अनिशेट्टर यांना फोन करण्यास सुरुवात केली. अधिकारी ए व बी खात्यांच्या नोंदणीत व्यस्त होते. त्यामुळे त्यांनी नगरसेवकाचा फोन घेतला नाही. शेवटी 20 हून अधिकवेळा सातत्याने फोन केल्याने अनिशेट्टर यांनी त्या नगरसेवकाचा फोन उचलून आपण कामात व्यस्त आहे. थोड्या उशिराने बोलतो, असे सांगून फोन बंद केला.

त्यानंतर काहीवेळाने नगरसेवक आरडाओरड करतच महापालिकेत दाखल झाला. महसूल अधिकारी अनिशेट्टर यांना अर्वाच्च शब्दात शिवीगाळ करण्यासह अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महापालिका आवारात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. हा प्रकार लक्षात येताच त्या ठिकाणी असलेले सरकारनियुक्त सदस्य दिनेश नाशीपुडी व इतरांनी मध्यस्थी करुन वादावर पडदा पाडला. महसूल उपायुक्त रेश्मा तालीकोटी या देखील त्या ठिकाणी दाखल झाल्या. त्यांनी कागदपत्रांची पाहणी केली आणि कमी असलेली कागदपत्रे संबंधित नगरसेवकाला देण्यास सांगितल्यानंतर वादावर पडदा पडला.
logo payment
अर्धवट नाही.. वाचा पूर्ण बातमी...!
पूर्ण बातमी वाचण्यासाठी Payment करा
logo top
प्रीमियम मेंबरशिप घेतले असेल तर Login करा
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
logo
Pay Monthly ₹ 5
₹ 5 एक महिना
logo
Pay Quarterly ₹ 15
₹ 15 तीन महिने
प्रीमियम मेंबरशिप घेतले नसेल तर Payment करा आणि पूर्ण बातमी वाचा कोणत्याही अडथळ्याविना

belgaum news heated argument between corporator and revenue officer Anishettar

belgaum news belagavi Belgaum City Corporation

बेळगाव : नगरसेवक vs अधिकाऱ्यामध्ये हमरीतुमरी
अपशब्द वापरल्याने वादाची स्थिती @महापालिका अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm