बेळगाव—belgavkar—belgaum : अथणी : नंदेश्वर (ता. अथणी) येथील सुभाष सदाशिव बळवाड (वय 30) चा ट्रान्स्फॉर्मरवर काम करताना गुरुवारी सकाळी 11 वाजता विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. वीज पुरवठा बंद करून काम करत असताना वीज पुरवठा कोणी सुरु केला? त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
याबाबत माहिती अशी, सुभाष बळवाड हे अथणी हेस्कॉमला (HESCOM) वायरमन म्हणून काम करतात. ते सत्ती सेक्शन ऑफिसला होते. ट्रान्स्फॉर्मरवर काम करत असताना त्यांनी वीज पुरवठा खंडित केला होता. परंतु अचानक वीज पुरवठा सुरु झाल्यामुळे त्यांना विजेचा धक्का लागला त्यात त्यांचा मृत्यू झाला.
घटनेमागचे नेमके कारण काय? वीज पुरवठा कोणी सुरु केला, याविषयी पोलिसांकडून चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांच्या नातेवाइकांनी केली आहे. अथणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
