बेळगाव : @सह्याद्रीनगर सेंट्रींगच्या 43 प्लेट पळविल्या

बेळगाव : @सह्याद्रीनगर सेंट्रींगच्या 43 प्लेट पळविल्या

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव-belgavkar : सह्याद्रीनगर येथे नव्याने बांधकाम सुरु असलेल्या घरातून सेंट्रींगच्या साहित्याची चोरी झाल्याची घटना सोमवार दि. 13 रोजी सकाळी उघडकीस आली आहे. चोरट्यांनी स्लॅब घालण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सेंट्रींगच्या लोखंडी 43 प्लेट पळविल्या आहेत. याप्रकरणी एपीएमसी पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. श्रीनिवास देवाप्पा भातकांडे (रा. सावगाव) यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. श्रीनिवास हे सेंट्रींग मेस्त्री असून सह्याद्रीनगर येथे नव्याने सुरु असलेल्या घराचे काम ते करत आहेत. पहिल्या मजल्याचे स्लॅब पूर्ण झाले असून दुसऱ्या मजल्याचे काम लवकरच सुरु केले जाणार होते. त्यामुळे स्लॅब घालण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या एकूण 171 प्लेट त्यांनी चार थर लावून ठेवल्या होत्या. मात्र चोरट्यांनी रविवारी रात्री त्यापैकी 43 प्लेट पळविल्या आहेत. नव्याने बांधकाम सुरु असलेल्या घरमालकाने त्याठिकाणी वॉचमनची नियुक्ती केली आहे. मात्र वॉचमनला याचा थांगपत्ता लागला नाही. प्लेट ठेवलेल्या ठिकाणी दिसून न आल्याने सोमवारी सकाळी गवंडी कामगारांनी सेंट्रींग मेस्त्रीला फोनवरुन विचारणा केली. त्यानंतर भातकांडे यांनी कामाच्या ठिकाणी धाव घेऊन पाहणी केली असता प्लेट चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याच बांधकामावर यापूर्वीही लोखंड चोरीला गेले होते. त्यानंतरची ही दुसरी घटना आहे. एका प्लेटची किंमत 1500 रुपये असून 43 प्लेट चोरीला गेल्या असल्याने सेंट्रींग मेस्त्री भातकांडे यांचे 64,500 रुपयांचे नुकसान झाले आहे.
logo
Pay Monthly ₹ 5
₹ 5 एक महिना
logo payment
अर्धवट नाही.. वाचा पूर्ण बातमी...!
पूर्ण बातमी वाचण्यासाठी Payment करा
logo top
प्रीमियम मेंबरशिप घेतले असेल तर Login करा
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
logo
Pay Monthly ₹ 5
₹ 5 एक महिना
logo
Pay Quarterly ₹ 15
₹ 15 तीन महिने
logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
प्रीमियम मेंबरशिप घेतले नसेल तर Payment करा आणि पूर्ण बातमी वाचा कोणत्याही अडथळ्याविना

belgaum robbery sahyadrinagar house belgaum robbery

बेळगाव : @सह्याद्रीनगर सेंट्रींगच्या 43 प्लेट पळविल्या

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm