बेळगाव : मध्यवर्ती बसस्थानकावर विद्यार्थिनीला मारहाण, तिघांवर गुन्हा

बेळगाव : मध्यवर्ती बसस्थानकावर विद्यार्थिनीला मारहाण, तिघांवर गुन्हा

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव-belgavkar : परिवहनच्या बसमधील सीटवर बसण्यावरून झालेल्या वादावादीनंतर एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला तिघा जणांनी शिविगाळ करण्यासह मारहाण केल्याची घटना सोमवारी सायंकाळी 7.15 च्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानकावर घडली आहे. याप्रकरणी कौशल्या महालिंगप्पा यळवत्ती (वय 21, रा. बम्मीगट्टी, ता. कलघटगी, जि. धारवाड) हिने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी मोहम्मदअजिम सवनूर, शहनाज सवनूर आणि करिष्मा सवनूर (तिघेही रा. हुबळी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे.
logo
Pay Monthly ₹ 5
₹ 5 एक महिना
याबाबत पोलिसांतून समजलेली अधिक माहिती अशी, फिर्यादी कौशल्या ही राणी चन्नम्मा विद्यापीठात शिकत आहे. त्यामुळे ती दररोज परिवहनच्या बसमधून बेळगावला ये-जा करत होती. सोमवारी सायंकाळी 7.15 च्या दरम्यान ती आपली मैत्रीण अक्षता (रा. धारवाड) आणि वर्षा (रा. धारवाड) या दोघांसमवेत कॉलेज संपवून आपापल्या गावी जाण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकावर आले. बेळगावहून धारवाड मार्गे बळ्ळारीला जाणारी बस येताच कौशल्या बसमध्ये चढली व सीटवर जाऊन बसली.
logo
Pay Quarterly ₹ 15
₹ 15 तीन महिने
logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
सदर सीटवर आधीच काहींनी एका ठिकाणी पाण्याची बॉटल तर दुसऱ्या सीटवर पिशवी ठेवली होती. त्यामुळे कौशल्या रिकाम्या असलेल्या तिसऱ्या सीटवर बसली. काही वेळानंतर एक महिला त्याठिकाणी आली आणि आम्ही तिघेजण आहे. त्यामुळे तू येथून उठ असे सांगितले. त्यावर मी तुमच्यासाठी दोन सीट सोडल्या आहेत. त्याठिकाणी तुम्ही बसा, असे सांगितल्यानंतर त्याठिकाणी थांबलेल्या दोघी महिलांसह एका पुरुषाने कौशल्याबरोबर भांडण काढून शिविगाळ करत मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली. यामध्ये कौशल्याच्या मोबाईलचे नुकसान झाले असून तिने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून घेऊन पोलिसांनी तपास चालविला आहे.
logo payment
अर्धवट नाही.. वाचा पूर्ण बातमी...!
पूर्ण बातमी वाचण्यासाठी Payment करा
logo top
प्रीमियम मेंबरशिप घेतले असेल तर Login करा
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
logo
Pay Monthly ₹ 5
₹ 5 एक महिना
logo
Pay Quarterly ₹ 15
₹ 15 तीन महिने
logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
प्रीमियम मेंबरशिप घेतले नसेल तर Payment करा आणि पूर्ण बातमी वाचा कोणत्याही अडथळ्याविना

belgaum bus stand student attack belgaum student bus issue

बेळगाव : मध्यवर्ती बसस्थानकावर विद्यार्थिनीला मारहाण, तिघांवर गुन्हा

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm