टीम इंडियाचा कॅप्टन क्रिकेटर विराट कोहली हा प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. क्रिकेट आणि जाहिरातीतून इतकी कमाई होत आहे. त्याने आता रेस्टॉरंट चेनही उघडली आहे. विराट कोहलीने वन 8 कम्यून (One8 Commune) नावाची रेस्टॉरंटची चेन उघडली आहे. या संबंधीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
हैदराबाद येथे विराट कोहली याच्या रेस्टॉरंटमध्ये एका विद्यार्थीनीने भूट्टा (म्हणजे आपले मक्याचं भाजलेलं कणीस) ऑर्डर केला. त्यानंतर जे बिल आले त्याने सोशल मीडियावर गोंधळ माजला आहे. याआधी देखील रेस्टॉरंटच्या जीएसटीवरुन लोकांच्या तीव्र प्रतिक्रीया आलेल्या आहेत.
woman pays Rs 525 for 'bhutta' : Virat Kohli च्या रेस्टॉरंटमध्ये एका स्नेहा नावाच्या विद्यार्थीनीने भूट्टा ऑर्डर केला तर तिला त्यानंतर आलेले बिल पाहून तिला धक्का बसला. रस्त्यावर 10 ते 50 रुपयांना मिळणारा भूट्टा येथे फारच महाग मिळाला. त्यानंतर तिने या रेस्टॉरंटचे आलेले बिल शेअर केले आहे. या विद्यार्थ्यांने केलेल्या पोस्टमध्ये आता एका प्लेटमध्ये भूट्टा ठेवलेला दिसत आहे. त्यावर कोथिंबिर आणि लिंबूने गार्निशींग केलेली दिसत आहे. हा फोटो पोस्टमध्ये तिने लिहीलेय की मी One8 Commune मध्ये 525 रुपयांचे पेमेंट केले आहे. कॅप्शनमध्ये विद्यार्थीनीने एक रडणारी इमोजी टाकली आहे. सामान्यत : स्थानिक बाजारात 10 ते 50 रुपये मिळणारा हा भूट्टा आता रेस्टॉरंटमध्ये 10 ते 12 पट महाग मिळणार आहे.