Late Apple co-founder Steve Job
handwritten letter of Steve Jobs offers a glimpse into his spiritual side and talks about his plans to visit India for the Kumbh Mela.
Maha Kumbh 2025 : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ-2025 मध्ये भक्तांचा मेळा भरला आहे. महाकुंभच्या पहिल्या शाही स्नानाला मंगळवारी 3.5 कोटी भाविकांना संगमात आस्थेने डुबकी मारत स्नान केले आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी एप्पलचे दिवंगत सह सस्थापक स्टीव्ह जॉब्स यांची पत्नी लॉरेन पॉवले जॉब्ल देखील पोहचल्या आहे. या दरम्यान, त्यांचे पती स्टीव्ह जॉब्स यांनी साल 1974 मध्ये पन्नास वर्षांपूर्वी लिहीलेले पत्र सध्या चर्चेत आहे. या पत्राला लिलावात 4.32 कोटी रुपये मिळाले आहेत.
अॅप्पलचे सह संस्थापक दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांनी कुंभ मेळ्यासंदर्भात एक पत्र साल 1974 रोजी लिहिले होते. त्यांनी आपल्या 19 व्या जन्मदिवसाच्या ठीक आधी हे पत्र लिहिले आहेत. हाताने लिहिलेल्या या पत्रात स्टीव्ह जॉब्सन यांनी भारत आणि भारताच्या अध्यात्मिक वातावरणाबद्दलचा आपला रस दाखविला आहे. त्यांनी आपल्या भावना या पत्राद्वारे लिहीत भारत भरणाऱ्या कुंभ मेळ्या बाबतची आपल्या योजनेबद्दल लिहीले होते.स्टीव्ह जॉब्स यांनी आपल्या बालपणीचा मित्र टीम ब्राऊन यांना पत्र पाठविले आहे.
स्टीव्ह जॉब्स यांनी लिहीलेल्या 50 वर्षे जुन्या पत्राचा लिलाव करण्यात आला आहे. या पत्रासाठी सर्वाधिक बोली लावण्यासाठी मोठी स्पर्धा होती. लिलाव केले गेलेले पत्र स्टीव्ह जॉब्स यांनी लिहीलेले पहिले पत्र आहे. सर्वाधिक बोली लावणाऱ्या एका व्यक्तीने 500,312.50 डॉलरची (4.32 कोटी रुपये) रुपये देऊन हे पत्र विकत घेतले आहे.
या पत्रात स्टीव्ह जॉब्स लिहीतात की, मी एप्रिलमध्ये भारतात सुरु होणाऱ्या कुंभ मेळ्यासाठी भारतात जाऊ इच्छीत आहेत. मी मार्च महिन्यात कोणत्याही वेळी येऊ शकतो. हे अजून निश्चित झालेले नाही...’ या आपल्या पत्राचा शेवट त्यांनी ‘शांती’ या शब्दाने केला आहे.हे पत्र त्यांचं हिंदू धर्माबद्दलचे प्रेम दर्शवत आहे. त्यांनी भारतातील आपल्या संभाव्य दौऱ्या सह येथील संस्कृती आणि शिक्षणासंदर्भात देखील लिहीले आहे. साल 1974 मध्ये त्यांनी भारताचा प्रवास केला होता.याची सुरुवात त्यांनी उत्तराखंड येथून केली होती. नीम करोली बाबा यांच्या आश्रमात जाण्याची योजना त्यांनी केली होती. आणि कैंची धाम येथे ते राहीले होते. भारतात सात महिने राहून भारतीय संस्कृतीला जाणले होते.