गृहमंत्री अमित शाह हे त्यांचा मुलगा जय शाह यांना झापत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. अहमदाबाद येथील जगन्नाथ मंदिरात आरती सुरु असतानाचा हा व्हिडीओ आहे आणि त्यात आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांना वडिलांचा ओरडा खावा लागत असल्याचे दिसत आहे. अमित शाह तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत.
या व्हिडीओमध्ये अमित शाह आरती करताना दिसत आहेत आणि आरतीचं ताट घेऊन जेव्हा ते जय शाह याच्या मुलाजवळ जाताना दिसत आहेत. ते स्वतः आरतीच्या दिव्यांवर हात फिरवून त्याची ऊब नातवाच्या चेहऱ्याला देताना दिसत आहेत. पण, जय शाह त्यांच्या मुलाला आगीपासून दूर नेताना दिसत आहेत आणि तेव्हाच अमित शाह यांनी त्यांना झापले.
'कस्सू नयी थे, तारे कै नोवो नको छोकरो छे' (काही होणार नाही; तुझा मुलगा नवीन आणि जगावेगळा आहे का?).
Please click here to Watch this Video or photo on X (Twitter)
गृहमंत्र्यांनी काही वेळ काढून अहमदाबादमधील उत्तरायणाच्या शुभमुहूर्तावर कुटुंबासह जगन्नाथ मंदिराला भेट दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) सर्वात तरुण अध्यक्ष बनलेले जय शाह हेही त्यांच्यासोबत होते. बीसीसीआयने रविवारी विशेष सर्वसाधारण सभेत जय शाह यांचा सत्कार केला. जय शाह यांनी ऑक्टोबर 2019 पासून बीसीसीआयचे सचिव म्हणून काम केले आणि जानेवारी 2021 पासून आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही काम केले.