बेळगाव—belgavkar—belgaum : बेळगावहून कारवार, कुमठा, गोकर्ण, उडुपी या परिसरात धावणारी एकमेव साप्ताहिक एक्स्प्रेस पुढील दोन महिने पर्यायी मार्गाने धावणार आहे. पुणे-एर्णाकुलम पूर्णा एक्स्प्रेस सांगली, बेळगाव, लोंढा मार्गे न धावता कोकण रेल्वेमार्गे धावणार आहे.
कॅसलरॉक ते कुळे दरम्यान रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीचे काम केले जाणार असल्याने नैर्ऋत्य रेल्वेने या मार्गावरील बऱ्याचशा रेल्वे रद्द केल्या आहेत, तर काहींच्या मार्गामध्ये बदल केला आहे. पूर्णा एक्स्प्रेस दि. 18 जानेवारी ते 12 एप्रिल दरम्यान कोकण रेल्वेमार्गे धावणार आहे. यामुळे मिरज-बेळगाव-लोंढा परिसरातील प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
Diversion of trains : Train No. 11097 Pune-Ernakulam Poorna Weekly Express, journey commencing from January 18 to April 12, 2025, will be diverted to run via Pune, Panvel, Roha, and Madgaon stations. It will skip its regular stoppages from Satara to Sanvordem stations. Train No. 11098 Ernakulam-Pune Poorna Weekly Express, journey commencing from January 20 to April 14, 2025, will be diverted to run via Madgaon, Roha, Panvel and Pune stations. The train will skip its regular stoppages from Sanvordem to Satara stations.