बेळगाव—belgavkar—belgaum : निपाणी : खडकलाट येथील तरुण बेपत्ता झाल्याची फिर्याद खडकलाट पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. शंकर पिराजी नाईक (वय 45) असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे.
शंकर नाईक हे नाईक कोडी या ठिकाणी पत्नी व मुलांसह वास्तव्याला आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ते परत आलेले नाहीत. यासंदर्भात त्यांची पत्नी दीपा नाईक यांनी खडकलाट पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. त्यांना कन्नड, मराठी व हिंदी भाषा अवगत आहेत. त्यांच्याविषयी माहिती मिळाल्यास 9740976719 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.