बेळगाव—belgavkar—belgaum : खानापूर / कारवार : कारवार (उत्तर कन्नड) चे खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांच्या शिरसी येथील घरात सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास बिबट्याने प्रवेश केला होता. काही काळ बिबट्या घरात इकडे तिकडे फिरत होता वखाद्याचा शोध घेतल्यानंतर तेथून पळ काढला. खासदार घरातच होते.
रात्री घराच्या परिसरातील असणाऱ्या बागेतून बिबट्या घराच्या अंगणात आला. त्याने कुत्र्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला; पण तो प्रयत्न फसला. त्यामुळे काही वेळाने तो तेथून अंधारात निघून गेला. या हल्ल्यात कुत्रा थोडक्यात बचावला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
वनाधिकाऱ्यांनी खासदार हेगडे यांच्या घरी भेट देऊन बिबट्याच्या वावराची माहिती घेतली आहे. शिरसी आणि यल्लापूर हा भाग घनदाट दंगलाचा असल्यामुळे तिथे जंगली प्राण्यांचा वावर असतो. त्यामुळेच व येथे बिबट्याचे दर्शन वारंवार होत असते.