बेळगाव—belgavkar—belgaum : खानापूर खानापूर-नंदगड मार्गावरील कौंदल येथे हत्तींचे पुन्हा आगमन झाले आहे. कौंदल येथील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते नागेश भोसले यांच्या शेतातील केळीची झाडे, नारळ, सागवानची लहान झाडे तसेच भाजीपाल्याचे अतोनात नुकसान करण्यात आले असून, त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
नागेश भोसले यांच्या शेतात मंगळवारी नारळाची व केळीची झाडे मुळासकट उपटून नासधूस केलेली दिसली. भोसले यांनी आपल्या शेतीमध्ये भाजीपाल्याची लागवड केली होती. त्याचे सुद्धा हत्तींकडून नुकसान केल्याचे दिसून आले. शेत परिसरात हत्तींच्या पायांचे ठसे आढळून आल्यानंतर याबाबतची माहिती वन खात्याला देण्यात आली आहे.