बेळगाव—belgavkar—belgaum : दहावीच्या परीक्षेला 21 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी ज्या परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे, त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, तसेच ज्या शाळांत सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त आहेत, त्या शाळांनी कॅमेरे दुरुस्त करून घ्यावेत, अशी सूचना केली आहे. 21 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत परीक्षा होणार असून, यावेळी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 35 हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. दहावीच्या परीक्षेला अजून काही दिवसांचा कालावधी असला तरी शिक्षण खात्याकडून परीक्षेची सर्व तयारी केली जात आहे.
गट शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून ज्या शाळांत परीक्षा केंद्र आहे, तेथे आवश्यक ती तयारी करावी, अशी सूचना केली आहे. परीक्षेवेळी गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी ज्या शाळांमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. त्या कॅमेऱ्यांची दुरुस्ती करावी लागणार आहे. तर ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावे लागणार आहेत. सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने परीक्षा काळात गैरप्रकार घडू नयेत, यासाठी शाळेचा आवार आणि इतर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सूचना केली आहे.
परीक्षा सुरळीत व्हावी, यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सक्ती केली आहे. ज्या शाळांत सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, त्या शाळांनी परीक्षेपूर्वी सीसीटीव्ही बसवून घेऊन त्याची चाचणी करून घेणे गरजेचे आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील अनेक परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. मात्र, काही शाळांमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत, तर काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज आहे. अशा शाळांना शाळेचा आवार व प्रवेशपत्रिका खुली करण्याच्या खोलीत कॅमेरे बसवून घेण्याची सूचना शिक्षण खात्याने केली असून, यासाठी शाळेत राखीव असलेल्या निधीचा वापर करावा, असेही शिक्षण खात्यातर्फे कळविले आहे
दहावी परीक्षेचे वेळापत्रक असे 21 मार्च- मराठी, कन्नड, इंग्रजी, ऊर्दू (प्रथम भाषा) 24 मार्च - गणित 26 मार्च - इंग्रजी, कन्नड (द्वितीय भाषा) 29 मार्च - समाज विज्ञान 2 एप्रिल - विज्ञान 4 एप्रिल - कन्नड, इंग्रजी (तृतीय भाषा) The Karnataka SSLC exam 2025 will be held from March 21 to April 4, 2025. The Karnataka SSLC exam 2025 will be held from March 21 to April 4, 2025.