बेळगाव—belgavkar—belgaum : बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना, बेळगाव स्पोर्ट्स क्लब, रोटरी क्लब ऑफ बेळगावतर्फे आयोजित व सतीश जारकिहोळी फाऊंडेशन पुरस्कृत राष्ट्रीय पुरुष व महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेला मंगळवारी प्रारंभ झाला. स्पर्धेसाठी देशभरातील 400 हून अधिक शरीरसौष्ठवपटू बेळगावात दाखल झाले आहेत. बेळगावात सुरु असलेल्या या स्पर्धेने देशाचे लक्ष वेधले आहे. या स्पर्धेसाठी आसाम, मिझोराम, नागालैंड येथूनही स्मर्थक आले आहेत.
बुधवारी खेळाडूंची चाचणी होणार असून गुरुवारी मुख्य स्पर्धा होणार आहे. मंगळवारी सकाळपासून सावगांव रोडवरील अंगडी कॉलेजच्या एका सभागृहात नावनोंदणी व स्पर्धकांची वजने घेण्याची लगबग सुरु होती. मान्यवरांच्या हस्ते गणेश पूजन करण्यात आले. फेडरेशनचे अध्यक्ष स्वामी उमेशकुमार, सचिव हिरल सेट, भारतातील पहिले मि. युनिव्हर्स पद्मक्षी प्रेमचंद डिग्रा, अर्जुन पुरस्कार विजेते तो व्ही पॉली, भास्करन, बॉबी सिंग, नवनीतसिंग, बेळगावात दाखल झाले आहेत. स्पर्धेसाठी विविध राज्यांहून 400 खेळाडूंसह पंच दाखल झाले आहेत. त्यांच्या राहण्या जेवण्याची सोय आयोजकांनी केली आहे.
यावेळी माजी प्रांतपाल अविनाश पोतदार, आंतरराष्ट्रीय पंच अजित सिद्दण्णावर, मि. इंडिया सुनील आपटेकर, बेळगाव शरीरसौष्ठय संघटनेचे अध्यक्ष एम. गंगाधर, सचिव हेमंत हावळ, विकास कलघटगी, शेखर जानवेकर, सुनील राऊत, बंडू मजुकर, नागराज कोलकार, सुनील पवार, अनंत लंगरकांडे आदी उपस्थित होते. अन्नोत्सवाला जोडून राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा असल्याने ही बेळगावकरांसाठी पर्वणी आहे. क्रीडाप्रेमींनी प्रतिसाद देण्याची गरज आहे - स्वामी रमेशकुमार, अध्यक्ष, इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशन