बेळगाव—belgavkar—belgaum : बेळगाव तालुक्यातील सुळेभावी श्री महालक्ष्मी देवीचा यात्रा महोत्सव या महिन्यात होणार आहे. यानिमित्त रविवारी दुचाकी फेरी काढण्यात आली. श्री महालक्ष्मी देवीचो विशेष पूजा करून या फेरीला सुरुवात करण्यात आली. येत्या 18 ते 26 मार्चपर्यंत यात्रा होणार आहे. 'महालक्ष्मी माता की जय, उदो उदो' अशा घोषणा देत असंख्य भाविक या फेरीत सहभागी झाले होते.
सुळेभावी देवस्थान आवारापासून दुचाकी फेरीला सुरुवात झाली. गावातील मुख्य मार्गावरून खणगाव बी. के., अष्टे, कणबर्गीमार्गे बेळगाव शहरात आली. राणी चन्नम्मा चौकापासून धर्मवीर संभाजी चौकापर्यंत आल्यानंतर तेथून पुन्हा परतीच्या मार्गावरून राणी चन्नम्मा मार्गावरून गांधीनगर, सांबरा रस्त्यावरून पुन्हा सुळेभावीला पोहोचली.
महालक्ष्मी देवस्थान जीर्णोद्धार ट्रस्ट कमिटी, पुजारी, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ट्रस्टचे अध्यक्ष देवण्णा भंगेष्णवर यांनी, दर 5 वर्षांनी गावची श्री महालक्ष्मी देवी यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते. यंदा 18 पासून यात्रेला प्रारंभ होणार असून भाविकांनी यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. ट्रस्ट कमिटीचे सदस्य बसनगौडा पाटील यांनी यात्रा महोत्सवानिमित्त गावात आवश्यक पूर्वतयारी करण्यात येत असून भाविकांच्या सोयीसाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले
