बेळगाव—belgavkar—belgaum : येथील नगर परिषदेवर अंतिम टप्प्याच्या कालावधीसाठी पुन्हा काँग्रेस गटाचीच सत्ता स्थापन करण्यात यश आले आहे. निजदच्या दोन्ही नगरसेवकांनी काँग्रेसच्या गटालाच पाठिंबा दिल्याने नगराध्यक्षपदी बसवराज गुंडकल्ले तर उपनगराध्यक्षपदी विजयलक्ष्मी नवले यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार चिदंबर कुलकर्णी यांनी काम पाहिले.
आमदार प्रकाश हुक्केरी यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार गणेश हुक्केरी आणि खासदार प्रियांका जारकीहोळी सदलगा नगरपरिषदेवर काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आणि बहूमत सिद्ध करण्यासाठी नगरपरिषदेच्या सभागृहात उपस्थित होते. भाजप गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी हेमंत शिंगे यांनी अर्ज दाखल केला. अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपूर्वीच त्यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी नगराध्यक्षपदी बसवराज गुंडकल्ले तर उपनगराध्यक्षपदी विजयलक्ष्मी नवले यांची निवड झाल्याचे जाहीर केले. 21 ऑक्टोबर 2025 पर्यंतच्या कालावधीसाठी ही बिनविरोध निवड झाली.
तहसीलदार चिदंबर कुलकर्णी यांनी नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष पदांच्या निवडीची घोषणा केल्यानंतर नगरपरिषद कार्यालयासमोर आणि बसवराज गुंडकल्ले यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी उपतहसीलदार पी. बी. शिरिवंत, नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले, उपनगराध्यक्षा विजयलक्ष्मी नवले, महसूल निरीक्षक एम. ए. नागराळे,
