बेळगाव—belgavkar—belgaum : निपाणी : करवाढ नसलेला 19 लाख 13 हजार 841 रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प सभापती डॉ. जसराज गिरे यांनी पालिका सभागृहात सादर केला. सत्तारुढ गटाच्या नगरसेवकांनी बहुमताने अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सोनल कोठडिया होत्या. यावेळी उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर यांची उपस्थिती होती. पालिका आयुक्त दीपक हरदी यांनी स्वागत केले.
डॉ. गिरे म्हणाले, कर आणि सरकारी अनुदान 24 कोटी 4 लाख 79 हजार, कॅपिटल ग्रेट 14 कोटी 64 लाख, इतर साधारण जमा 4 कोटी 27 लाख 29 हजार असे एकूण 42 कोटी 96 लाख 8 हजार 589 रुपये जमा होणार आहेत. अर्थसंकल्पातील खर्चाच्या तपशीलमध्ये राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनाकरिता 85 लाख, आंबेडकर भवन जागेसाठी 45 लाख, सार्वजनिक रस्ते, फुटपाथ व गटारी बांधकामासाठी महसूली खर्च 31 लाख 75 हजार, नवीन कामाचा खर्च 2 कोटी 15 लाख, पथदीपांकरिता महसूली खर्च 2 कोटी 71 लाख 20 हजार, नवीन कामाचा खर्च 38 लाख, सार्वजनिक शौचालय व स्वच्छता गृहांसाठी 10 लाख व 54 लाख, घनकचरा निर्मूलन 3 कोटी 62 लाख 50 हजार, पाणीपुरवठा विभागासाठी 4 कोटी 37 लाख 36000 व 1 कोटी 17 लाख 80 हजार, उद्यानांसाठी 2 लाख व 25 लाख,
स्मशानभूमी विकासासाठी 30 लाख, 24.10 टक्के निधीतून 2 लाख 62 हजार व 3 लाख 93 हजार, 29 टक्के निधीतून एससीएसटी जनतेसाठी 13 लाख 20 हजार व 19 लाख 80 हजार, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी 1 लाख 27 हजार, शिवाजी उद्यान येथे एअरक्राफ्ट बसवण्यासाठी 1 कोटी 25 रुपये, झाडे लावा योजनेसाठी 5 लाख, म्युनिसिपल हायस्कूल बांधकामासाठी 1 कोटी 50, शहरातील चौकांचे सौंदर्याकरण 25 लाख, जयंती उत्सवासाठी 1 लाख 50 हजार, नवीन तलावाच्या निर्मितीसाठी डीपीआर करण्यासाठी 40 लाख, म्युनिसिपल हायस्कूल संरक्षक भितीसाठी 25 लाख, सफाई कर्मचाऱ्यांकरिता विश्रांतीगृह बांधण्यासाठी 10 लाख, दत्त खुले नाट्यगृह येथे मिनी फिल्टर प्लांट उभारणे 52 लाख, सफाई कर्मचाऱ्यांची शारीरिक तपासणी 5 लाख, शहरातील प्राण्यांचे नियंत्रण व कुत्र्यांसाठी रेबीज व्हॅक्सिनेशन 10 लाख, दिशादर्शक फलक बसवणे 10 लाख रुपये याप्रमाणे तरतुदी करण्यात आली आहे.
या अर्थसंकल्पात भविष्यात येणाऱ्या जल संकटाला तोंड देण्यासाठी निधीची तरतूद केलेली आहे. नवीन वर्षाच्या या अर्थसंकल्पात जनतेवर कोणताही अतिरिक्त बोजा न घालता शहरांमध्ये नवीन कामांची तरतूद केली असल्याचे डॉ. गिरे यांनी सांगितले. जुनी शाळा व इमारत पाडून या तलावाचे सुशोभीकरण केले जाणार आहे. सद्दाम नगारजी यांनी शादीमहलसाठी तरतूद केल्याबद्दल अभिनंदन केले. अनिता पठाडे यांनी सर्व समाजाचा विचार करून अर्थसंकल्प मांडावा, अशी सूचना केली. परंतु हा अर्थसंकल्प निपाणी शहराच्या विकासासाठी आहे. कोणत्याही जाती, धर्मासाठी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. यावेळी सत्ताधारी व विरोधी गटाचे नगरसेवक उपस्थित होते.शादीमहलसाठी 25 लाखअर्थसंकल्पात मुस्लिम समाजाच्या शादीमहलसाठी कोणतीही तरतूद केली नसल्याची तक्रार शेरु बडेघर यांनी केली. राजा शिवछत्रपती भवन, आंबेडकर भवनसाठी तरतूद केली. परंतु मुस्लिम समाजावर अन्याय होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या सूचनेनुसार शादीमहल बांधकामासाठी 25 लाख रुपयांची तरतूद करण्याची सूचना नगरसेवक विलास गाडीवार यांनी केली. राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनासाठी 85 लाख आंबेडकर भवन जागेसाठी 45 लाख पाणीपुरवठा विभागासाठी 4 कोटी 37 लाख स्मशानभूमी विकासासाठी 30 लाख शिवाजी उद्यानात एअरक्राफ्ट बसवण्यासाठी 1.25 कोटी सार्वजनिक शौचालय व स्वच्छता गृहांसाठी 10 लाख
