om-keshkamat-mumbai-indians-side-arm-bowling-mi-ipl-belgaum-khanapur-om-keshkamat-202010.jpeg | बेळगाव : खानापूरचा 'ओम' देतो 'मुंबई इंडियन्स'च्या फलंदाजांना सराव | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : खानापूरचा 'ओम' देतो 'मुंबई इंडियन्स'च्या फलंदाजांना सराव

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : माडीगुंजी खानापूरचे रहिवाशी श्यामसुंदर मोहन केशकामत यांचा कनिष्ठ चिरंजीव ओम केशकामत साईड आर्म गोलंदाजी स्पेशालिस्ट म्हणून मुंबई इंडियन्स संघाबरोबर आयपीएल साठी दुबईत वास्तव्यास आहे. मुंबई इंडियन्सच्या सर्व फलंदाजांना विविध प्रकारची साईड आर्म गोलंदाजी करत त्यांना फलंदाजीचा सराव देण्याचे काम करत असून त्याच्या गोलंदाजीमुळे मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना खूपच फायदा झाल्याचे कर्णधार रोहित शर्माने म्हटले आहे. ओम केशकामत हा माडीगुंजी येथील शारदा व मोहन शंकरराव केशकामत यांचा नातू असून, भाजपचे नेते शरद केशकामत यांचा तो पुतणा, तर आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी श्यामसुंदर मोहन केशकामत यांचा चिरंजीव होय. एका ग्रामीण भागातील सुपुत्राने फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भारतीय क्रिकेटमध्ये उंच भरारी घेतली आहे, याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सोशल मीडिया साठी घेतलेल्या एका मुलाखतीमध्ये रोहित शर्माने ओमच्या संघातील कार्याबद्दल माहिती दिली. ओमच्या साईड आर्म गोलंदाजी ची तारीफ करताना रोहित शर्मा म्हणतो की, ओम चे कार्य उल्लेखनीय असून सराव च्या सुरुवातीपासून ते सराव संपेपर्यंत ओम आपल्या साईड आर्म गोलंदाजीने सर्व फलंदाजांना सरावाचे धडे देतो. मुंबई इंडियन्स चे बिग हीटर्स असलेल्या कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या व सूर्यकुमार यादव तसेच रोहित शर्मा हे आपल्या फलंदाजीच्या सरावासाठी आमचीच मागणी करतात. ओम सुद्धा त्यांना निराश न करता त्या फलंदाजांच्या मागणीप्रमाणे ओवर पीच चेंडू, आखूड टप्प्याचे चेंडू, याॅर्कर चेंडू, शॉर्ट पिच बाउन्सर चेंडू असे विविध प्रकारचे चेंडू टाकतो. ओम सर्व फलंदाजांना सरावात मदत करतो. साईड आर्म हे एक छोटेसे प्लास्टिक यंत्र असून ज्यामधून भेदक गोलंदाजी करता येते. विविध प्रकारच्या चेंडू टाकण्यासाठी या यंत्रात गिअर असतात. गिअर बदलल्यानंतर त्याप्रमाणे चेंडू खेळपट्टीवर पडतो. पण हे यंत्र सर्वांना वापरण्यास येत नाही. त्याला खूप सरावाची गरज असते. आता ओम केशकामत या साईड फार्म गोलंदाजीसाठी तरबेज झाला असून मुंबई इंडियन्सच्या संघाचा तो एक अविभाज्य घटक ठरला आहे.
मुंबई इंडियन्स चा सरावाच्या पहिला दिवसापासुन ते आतापर्यंत तू संघाबरोबर असून दुबई येथे सुरू असलेल्या त्यांच्या सराव शिबिरात तो नेहमीप्रमाणे मुंबई इंडियन्स सर्व फलंदाजांना मदत करत आहे. आयपीएल मध्ये सहभागी मुंबई इंडियन्स चा एक अविभाज्य घटक असणे हे बेळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. उत्तरोत्तर प्रगती करत भारतीय संघात साईड आर्म गोलंदाज म्हणून नक्की स्थान मिळवेल अशी अपेक्षा आहे. सध्या भारतीय संघात सुद्धा उत्तर कर्नाटक मधील कुमठा येथील युवा साईड अर्म गोलंदाज रघु कार्यशील आहे. ओम केशकामत याचे शिक्षण ठाण्यातील सिंघानिया स्कूलमध्ये झाले. शालेय संघातून त्याने क्रिकेटला प्रारंभ केला. त्यानंतर त्याने महाविद्यालयातून क्रिकेट खेळताना त्याची ओळख मुंबई इंडियन्स संघाशी झाली. त्यांचा तो कायमस्वरूपी सदस्य झाला.