बेळगाव—belgavkar—belgaum : नुकताच झालेल्या सीए (CA : Chartered Accountant) परीक्षेमध्ये ज्योती संभाजी शटवाजी-पाटील हिने घवघवीत यश मिळवले आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. मूळचे कुणकीकोप (ता. खानापूर) येथील व सध्या विनायकनगर (पिरनवाडी) येथे वास्तव्य असणारे संभाजी पाटील यांची ती कन्या असून ती बालपणापासून एक हुशार विद्यार्थीनी म्हणून ओळखली जात होती.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
तिचे प्राथमिक शिक्षण संत मीरा शाळा (अनगोळ) येथे झाले. नंदगड (ता. खानापूर) येथील महात्मा गांधी महाविद्यालयात तिने पीयुसीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर गोगटे कॉलेज बेळगाव येथे पदवी संपादन केली.
प्रचंड इच्छाशक्ती व जिद्दीने तिने सीए होण्यासाठी प्रयत्न केले. पहिल्यांदा अपयश आले तरीही खचून न जाता स्वतः नोकरी सांभाळून अभ्यास केला व सीए परीक्षेत यश संपादन केले.
कुणकीकोप सारख्या एका खेड्यातील साधारण शेतकरी कुटुंबातील मुलीने हे कौतुकास्पद कार्य केले आहे, त्यामुळे तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. ज्योती यांना सीए पी. जी. भागवत व पती सीए संभाजी शटवाजी यांचे मार्गदर्शन लाभले असून सर्वत्र अभिनंदन होत आहे.
