
बेळगाव—belgavkar—belgaum
जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल, तर कोणतीही व्यक्ती जगात कुठेही यशस्वी होऊ शकते. अशी अनेक उदाहरणे आपल्याला समाजात पाहायला मिळतात आणि अशी माणसे इतरांसाठी नेहमीच प्रेरणास्थान ठरतात. प्रतिकूल परिस्थितीवर आपल्या कर्तृत्वाने मात करून इतरांसमोर आदर्श निर्माण करणारी अशीच एक व्यक्ती म्हणजे बेळगाव येथील माजी सैनिक सुरेश सनदी (पिरणवाडी, ता. बेळगाव) हे होत.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
भारतीय सेनेचे पूर्व सैनिक (Ex-(HONY) SUB MAJ SURESH SANADI NSG (Black Cat) COMMANDO) यांनी निवृत्तीनंतरही समाजकार्यात स्वतःला झोकून दिले आहे. त्यांनी
आता पिरणवाडी येथे SHRI MAHALAXMI COMMANDO ARMY COACHING ACADEMY सुरु केली आहे. ते भारत देशाची एकता, अखंडता आणि एकात्मता यासाठी कार्यरत आहेत.
त्यांच्या YouTube चॅनेलला लाखो Subscriber असून ते तरुणांना Online मार्गदर्शनही करतात. अनेक गोरगरिबांना त्यांनी त्यांच्या कोचिंग ॲकॅडमीत मोफत किंवा सवलतीच्या दरात प्रशिक्षण देतात.
त्यांच्या या अतुलनीय कार्याची दखल घेत लेफ्टनंट जनरल, जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ, दक्षिण कमान (General Officer Commanding in Chief, Southern Command) यांनी शनिवार, 19 जुलै 2025 रोजी त्यांना सन्मानित केले. याप्रसंगी त्यांना पारितोषक आणि मेडल देऊन गौरविण्यात आले, जो त्यांच्या समर्पित कार्याचा मोठा सन्मान आहे.
