बेळगाव : जमीन मूळ मालकांना देण्याचा अधिकार कुणी दिला — माजी आमदार रमेश कुडची
https://tinyurl.com/2ydkawua

बेळगाव : जमीन मूळ मालकांना देण्याचा अधिकार कुणी दिला — माजी आमदार रमेश कुडची

belgavkar.com | belgaum | belgavkar

भरपाई ऐवजी जागा मालकांना रस्त्यात गेलेली जमीनच परत देण्याचा निर्णय

बेळगाव—belgavkar—belgaum : बेळगाव महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांना सभागृहाचा अपमान करून परस्पर रस्त्याची जमीन मूळ मालकांना देण्याचा अधिकार कुणी दिला, असा सवाल माजी आमदार रमेश कुडची यांनी केला असून महापालिकेचा हा निर्णय बेकायदा असल्याचा आरोप त्यांनी केला.
माजी आमदार कुडची म्हणाले, शहापूरातील बँक ऑफ इंडिया ते जुना पी. बी. रोडपर्यंतचे रुंदिकरण स्मार्ट सिटी योजनेतून करण्यात आले आहे. त्यामध्ये महापालिकेला भरपाई देण्याचा संबंध नव्हता. पण, तरीही घाईगडबडीत आयुक्त दुडगुंटी यांनी सर्वसाधारण सभा बोलावून भरपाई देण्यासाठी ₹ 20 कोटी रुपयांबाबत ठराव मंजूर करून घेतला. पण, उच्च न्यायालयात आता परस्पर भरपाई ऐवजी जागा मालकांना रस्त्यात गेलेली जमीनच परत देण्याचा निर्णय घेतला आहे. असा प्रकार देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच झाला आहे. जो निर्णय लोकनियुक्त सभागृहाने घेतला आहे. त्याचा अवमान करून परस्पर निर्णय घेण्याचा अधिकार आयुक्तांना नाही. हा सारा प्रकार बेकायदा सुरू आहे.
कुणाच्या तरी सांगण्यावरून रस्ता करण्यात आला. त्याचा भुर्दंड महापालिकेने म्हणजेच सामान्य जनतेने का सहन करायचा, असा मुद्दा आहे. ज्यांनी रस्ता केला आहे, त्यांनीच भरपाई आणि इतर व्यवस्था करणे अपेक्षित असताना महापालिकेने मात्र सामान्यांच्या पैशावर गंडांतर आणण्याचा प्रकार केला आहे. महापालिकेने न्यायालयात केवळ जमीन देण्याचे सांगितले असले तरी जागा मालकाच्या वकिलाने जमिन आणि भरपाई मिळाली तरच माघार घेवू असे सांगितले आहे. त्यामुळे अजून काही जागा मालक आहेत, त्यांच्याबाबत महापालिका काय भूमिका घेणार आहे. त्यांना भरपाई कशी देणार, असा सवाल करून त्यांनी सामान्य जनतेची लूट सुरू असल्याचा आरोप केला.

Belgaum Belgaum Municipal Commissioner Ashok Dudgun belgavkar बेळगाव belgaum

belgavkar Belgaum Municipal Commissioner Ashok Dudgunty

Belgaum Municipal Commissioner Ashok Dudgunty belgaum

बेळगाव : जमीन मूळ मालकांना देण्याचा अधिकार कुणी दिला — माजी आमदार रमेश कुडची
भरपाई ऐवजी जागा मालकांना रस्त्यात गेलेली जमीनच परत देण्याचा निर्णय

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm