बेळगाव—belgavkar—belgaum : काकती येथील एका एटीएमला सोमवारी सकाळी आग लागली. पेट्रोल पंपाशेजारीच हे एटीएम सेंटर असून आगीमुळे धास्ती वाढली होती. स्थानिक नागरिकांनी टँकरने पाणी मारून आग आटोक्यात आणली आहे. गती पेट्रोल पंपला लागूनच एटीएम सेंटर आहे. सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास त्याला आग लागली. बाजूलाच पेट्रोल पंप असल्यामुळे आणि दुसऱ्या बाजूला लोकवस्ती असल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
ग्राम पंचायत सदस्य गजानन गव्हाणे यांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क झाला नाही. शेवटी पाण्याचा टँकर मागवून पाणी मारण्यात आले. टँकरमालक सय्यद, राजनारायण पांडे, त्रिलोकचंद पटेल, अरबाज नालबंद, नजीरअहमद, रोशन, जमीर, मस्तान, सादिक, यासीन, सुधा माळप्पन्नवर, मेघा केस्ती आदी पेट्रोल पंपवरील कर्मचाऱ्यांनीही आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.
वेळेत आग आटोक्यात आली नसती तर पेट्रोल पंपलाही धोका होता. यासंबंधी सोमवारी सायंकाळी काकती पोलिसांशी संपर्क साधला असता हे एटीएम बंद होते. कोणीही फिर्याद दिली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
