#महाकुंभमेळा #MahaKumbh #प्रयागराज

#महाकुंभमेळा #MahaKumbh #प्रयागराज

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगावच्या भाविकाचे निधन...!

वृत्तपत्र विक्रेते स्वामी भक्त रवी यांचे निधन

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यात स्नान करुन प्रयागराजहून परतताना बेळगावमधील वृत्तपत्र विक्रेते रवी जठार (61) यांचे पुणे येथे हृदयविकाराने निधन झाले आहे. ते देशपांडे गल्ली येथील रहिवासी होते. त्यांच्या निधनामुळे वृत्तपत्र व्यवसाय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. प्रयागराजहून बेळगावला परतत असताना रेल्वेमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यामुळे महाकुंभमेळ्यात बेळगावतील 5 बळी गेल्याची चर्चा आहे.
logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यात बुधवारी (29 जानेवारी) झालेल्या चेंगराचेंगरीत 30 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर 60 जण जखमी झाले आहेत. मौनी अमावस्येच्यानिमित्ताने त्रिवेणी संगमात अमृत स्नान करण्यासाठी अचानक चेंगराचेंगरी झाली.
कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीतील बेळगावातील मृतक
संगमघाटावर झालेल्या चेंगराचेंगरीत बेळगावातील चौघा भाविकांचा मृत्यू झाला. ज्योती हत्तरवाठ (वय 50) व त्यांची मुलगी मेघा (18, दोघीही रा. वडगाव, नाझर कॅम्प, बेळगाव), अरुण कोपर्डे (68, शेट्टी गल्ली, बेळगाव) व महादेवी बावनूर (48, रा. तिसरी गल्ली, शिवाजीनगर, बेळगाव) अशी त्यांची नावे आहेत. बेळगावातील 4 जणांचे मृतदेह दोन वेगवेगळ्या विमानाने आणण्यात येणार आहेत. प्रयागराजहून रुग्णवाहिकेने मृतदेह दिल्लीला आणि तेथून विमानाने बेळगावला नेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
logo
Pay Quarterly ₹ 15
₹ 15 तीन महिने
अरुण कोपर्डे व महादेवी भावनूर यांचे पार्थिव बेळगाव येथील सांबरा विमानतळावर सायंकाळी 5 वाजता दाखल होणार आहे. तर मेघा हत्तरवठ आणि ज्योती हत्तरवठ या आई व मुलीचा मृतदेह विमानातील अडचण आणि वेळेमुळे दिल्लीहून गोवा आणि गोव्याहून बेळगावला आणण्यात येणार आहे. दिल्ली-बेळगाव विमानाने वडगावातील दोघांचे मृतदेह दिल्लीहून गोव्याला रवाना होत असल्याने रात्री आठच्या सुमारास गोव्यात पोहोचण्याची शक्यता आहे आणि मध्यरात्री बेळगावला आणण्यात येतील.

सरकारने या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आम्ही न्यायमूर्ती हर्ष कुमार, माजी डीजी व्हीके गुप्ता आणि निवृत्त आयएएस डीके सिंह यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय न्यायालयीन आयोग स्थापन केला आहे. कुंभमेळा डीआयजी वैभव कृष्णा यांनी सांगितले की, महाकुंभमध्ये रात्री 1 ते 2 च्या दरम्यान चेंगराचेंगरी झाली. अचानक प्रचंड गर्दी झाली, भाविकांनी बॅरिकेड्स तोडले अन् त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. या घटनेतील 30 मृतांपेकी 25 जणांची ओळख पटली असून, त्यापैकी 19 युपीतील, 4 (बेळगाव) कर्नाटकातील आणि 1 गुजरातचा आहे. उर्वरित 5 जणांची ओळख पटवली जात आहे. या घटनेनंतर महाकुंबात प्रशासनाने मोठा फौजफाटा तैनात केला आहे. तसेच, कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
logo
Pay Monthly ₹ 5
₹ 5 एक महिना
प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येनिमित्त अमृत स्नानाआधीच प्रचंड गर्दी झाल्यानं चेंगराचेंगरीची घटना घडली. या चेंगराचेंगरीत बेळगावच्या 4 भाविकांचा मृत्यू झाला. तर 60 भाविक जखमी झाले. मृतांपैकी 25 जणांची ओळख पटलेली आहे. जखमींना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांची अधिकृत आकडेवारी घटनेनंतर जवळपास 20 तासांनी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली. डीआयजी वैभव कृष्ण यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत 30 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 60 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. यावेळी त्यांनी घटनेचं कारणही सांगितलं. दुर्घटनेतील 30 मृतांपैकी 25 जणांची ओळख पटलेली आहे. तर जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 36 जणांवर मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही जखमींवर सरकारी खर्चाने उपचार करण्यासंबंधीचे आदेश दिले आहेत.
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
अनेक कुटुंबांतील एकापेक्षा अधिक सदस्य या दुर्घटनेत मृत्युमुखी पावले आहेत. प्रचंड गर्दीच्या रेट्यामुळं बॅरिकेड्स तुटल्या. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. त्यात भाविकांचा मृत्यू झाला, असेही डीआयजी वैभव कृष्ण यांनी सांगितले. आखाडा मार्गावर मध्यरात्री साधारण दीड वाजताच्या सुमारास प्रचंड गर्दी झाली होती. झुंसी परिसरात बॅरिकेड्स तुटले. संगमाच्या दिशेने निघालेल्या गर्दीत स्नानाच्या प्रतीक्षेत थांबलेले अनेक भाविक सापडले, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
पाठिमागून प्रचंड गर्दीचा रेटा आला अन्...
महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर जवळपास 20 तासांनी प्रशासनानं मृतांची अधिकृत संख्या प्रशासनानं जाहीर केली. त्याचवेळी चेंगराचेंगरीचं कारणही सांगितलं. महाकुंभ डीआयजी वैभव कृष्ण यांनी ही घटना कशी घडली याची माहिती दिली. भाविक ब्रह्म मुहूर्ताच्या प्रतीक्षेत होते. त्याचवेळी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले. पाठिमागून गर्दीचा रेटा वाढल्याने अचानक गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. 29 तारखेला कोणतीही व्हीव्हीआयपी मुव्हमेंट नव्हती. यापुढील स्नानपर्वासाठीही कोणतीही व्हीव्हीआयपी मुव्हमेंट नसेल, असेही वैभव कृष्ण यांनी स्पष्ट केले.
logo payment
अर्धवट नाही.. वाचा पूर्ण बातमी...!
पूर्ण बातमी वाचण्यासाठी Payment करा
logo top
प्रीमियम मेंबरशिप घेतले असेल तर Login करा
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
logo
Pay Monthly ₹ 5
₹ 5 एक महिना
logo
Pay Quarterly ₹ 15
₹ 15 तीन महिने
प्रीमियम मेंबरशिप घेतले नसेल तर Payment करा आणि पूर्ण बातमी वाचा कोणत्याही अडथळ्याविना

Maha Kumbh stampede : 30 killed 60 injured 25 lakh ex gratia for kin of deceased belgaum death

Maha Kumbh Stampede : 30 dead 60 injured in stampede UP police

Mahakumbh stampede : Death toll rises to 30 around 90 people injured

#महाकुंभमेळा #MahaKumbh #प्रयागराज
बेळगावच्या भाविकाचे निधन...!

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm