बेळगाव—belgavkar—belgaum : खडकलाट : रेड्याला घेऊन जात असताना रेड्याला बांधलेली दोरी हातात गुंडाळल्याने खाली पडून झालेल्या घटनेत रेड्याचा मालक परगोंडा मल्लाप्पा हमिदवाडे (वय 80, रा. नाईंग्लज, ता. चिकोडी) यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सदरची घटना बुधवारी सकाळी 6.46 वा. घडली. या घटनेची नोंद खडकलाट पोलीस स्थानकात झाली आहे
याबाबत मिळालेली माहिती अशी की, परगोंडा हमिदवाडे हे सकाळी 6.45 वा. आपल्या घरातून आपल्या मालकीच्या रेड्यास गावाकडे घेऊन जात असताना अचानक रेडा बिथरला. यामुळे रेड्याला बांधलेली दोरी परगौडाच्या हातास गुंडाळली व परगौडा खाली पडले. मात्र पडलेल्या परगौडा यांना रेड्याने काही अंतर फरफटत नेले, यामुळे परगोंडाच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्यांना चिकोडीतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतानाच परगौडा यांचा बुधवारी मृत्यू झाला.