बेळगाव—belgavkar—belgaum : बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना, बेळगाव स्पोर्ट्स क्लब, रोटरी क्लब ऑफ बेळगाव यांच्यातर्फे सतीश जारकीहोळी फाऊंडेशन पुरस्कृत राष्ट्रीय पुरुष व महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाचा सी राहुल चॅम्पियन ऑफ चॅम्पियन बनला आहे. काँग्रेस नेते राहुल जारकीहोळी यांच्या हस्ते चॅम्पियन ऑफ चॅम्पियन किताब, आकर्षक ट्रॉफी आणि 3 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. महाराष्ट्राच्या शशांक वाकडे यांना उपविजेते पद मिळाले. रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड टीम चॅम्पियन टीम तर महाराष्ट्र टीम उपविजेती ठरली.
गुरुवारी 65 किलो वजनी गटात बेळगावच्या प्रताप कालकुंद्रीकर याने रौप्यपदक तर 75 गटात प्रशांत खन्नूकर याने कांस्यपदक पटकावले. 55 किलो गटात संतोष यादव (महाराष्ट्र) आणि 60 किलो गटात नितीन म्हात्रे (महाराष्ट्र) यांनी सुवर्णपदक पटकावले. गुरुवारी अंगडी कॉलेज आवारातील अन्नोत्सव मैदानात स्पर्धेच्या मुख्य फेरीला प्रारंभ झाला. प्रत्येक गटातून दहापैकी 5 शरीरसौष्ठवपटूंची निवड करण्यात आली. त्यानंतर पाच स्पर्धकांमध्ये झालेल्या कसरती पाहून पंचांनी अनुक्रमे क्रमांक जाहीर केले. 65 किलो गटात बेळगावचा प्रताप कालकुंद्रीकर चौथ्या फेरीत अंतिम तीनमध्ये राहिल्याने त्याचे पदक निश्चित झाले होते.
या गटात परीक्षित हजारीका (आसाम) याने सुवर्णपदकाला गवसणी घातली. बबन मुकुलदास (महाराष्ट्र) याने कांस्यपदक मिळविले. अजित सिंग जामवाल (जम्मू काश्मीर) व वैभव महाजन (रेल्वे स्पोर्ट्स) यांनी पाचवा क्रमांक पटकावला. प्रताप कालकुंद्रीकर याला आप्पासाहेब गुरव व मनोज गोविलगोळ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.60 किलो गटात नितीन म्हात्रे (महाराष्ट्र), राजेश घाडगे (विदर्भ), कांताबाला कृष्णा (रेल्वे स्पोर्ट्स), लैशरसिंग (मणिपूर), अमन पंडित (दिल्ली) यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावला.
55 किलो गटात संतोष यादव (महाराष्ट्र), नितीश कोलेकर (महाराष्ट्र) आर. गोपाळकृष्ण (तामिळनाडू), सूरजसिंग लंबगडीया (उत्तराखंड), मोईरंगमय्यूम मेइतेई (रेल्वे स्पोर्ट्स) यांनीअनुक्रमे क्रमांक पटकावले. गटातील पहिल्या पाच क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे 50 हजार, 40 हजार, 30 हजार, 25 हजार व 20 हजार रुपये तसेच पदक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
भारतीय शरीरसौष्ठव फेडरेशनचे संस्थापक संचालक मधुकर तळवळकर, जागतिक बॉडी बिल्डींग अँड फिजिक फेडरेशनचे सरचिटणीसचेतन पठारे, भारतीय शरीरसौष्ठव फेडरेशनचे अध्यक्ष स्वामी रमेशकुमार, खजिनदा नवनीतसिंग, उपाध्यक्ष तुलसी सुब्रम्हण्यम, अर्जुन पुरस्कार विजेते टी. व्ही. पॉली, विक्रम रोटे, माजी प्रांतपाल अविनाश पोतदार, आंतरराष्ट्रीय पंच अजित सिद्दण्णावर, मि. इंडिया सुनील आपटेकर बेळगाव शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष एम गंगाधर, सचिव हेमंत हावळ, विकास कलघटगी शेखर जानवेकर, सुनील राऊत, प्रकाश पुजारी गणेश गुंडप, बंडू मजुकर, नागराज कोलकार सुनील पवार, अनंत लंगरकांडे, नूर मुल्ला आकाश हुलियार, अश्विन निंगण्णावर आदी उपस्थित होते.