बेळगाव—belgavkar—belgaum : ऊस तोडणीसाठी आलेल्या पती-पत्नीमध्ये भांडण झाल्याने पतीने पत्नीच्या डोक्यात मोठा दगड घालून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री गोकाक तालुक्यातील उपरटी गावात घडली. मिराबाई जंगले (वय 30, रा. चंबुदर्गा, ता. माणगाव, जि. यवतमाळ, महाराष्ट्र) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून बबन जंगले (वय 40) असे संशयिताचे नाव आहे.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
सदर दाम्पत्य ऊस तोडणीसाठी गोकाक तालुक्यातील उपरटी खेड्यात आले होते. मंगळवारी सायंकाळी बबन जंगले याने मद्यपान करून किरकोळ कारणावरून पत्नीशी भांडण काढले. या भांडणातून बबन याने पत्नीच्या डोक्यात मोठा दगड घातल्याने ती जागीच गतप्राण झाली.
घटनास्थळी गोकाक डीवायएसपी, सीपीआय, गोकाक ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. या घटनेची नोंद गोकाक ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. गोकाक ग्रामीण पोलिस स्टेशन, ज्यांनी सध्या आरोपी बालाजीला ताब्यात घेतले आहे, ते तपास करत आहे.
