...तर कृपया लग्नच करा

...तर कृपया लग्नच करा

belgavkar.com | belgaum | belgavkar

प्रेमात पडणाऱ्या मुलांना कॅप्टन कूल धोनीचा मोलाचा सल्ला 

जर तिच्यासोबत तुम्ही खरंच आनंदात असाल तर कृपया लग्नच करा.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणजे महेंद्रसिंग धोनी. धोनीच्या नेतृत्वात भारताने सर्वाधिक तीनवेळा आयसीसीचा किताब पटकावला. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केले असले तरी त्याची झलक आयपीएलच्या माध्यमातून पाहायला मिळते. क्रिकेटच्या मैदानापासून दूर असलेला धोनी नेहमी काही ना काही कारणावरून चर्चेचा भाग बनतो. दरम्यान, शेवटच्या वेळी भारताने 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात विश्वचषक उंचावला होता. याशिवाय 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात भारताला यश आले होते. पण, त्यानंतर एकदाही भारताला आयसीसी इव्हेंटमध्ये किताब पटकावता आला नाही. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळख असलेल्या धोनीने देखील यंदाचा विश्वचषक भारत जिंकेल असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमात धोनीसमोर प्रश्नांची मालिका वाचली जात होती. अशातच एका चाहत्याने धोनीला एक भन्नाट प्रश्न केला. रिलेशनशिपबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना धोनीने म्हटले, 'कोणालातरी शोधा... जर तिच्यासोबत तुम्ही खरंच आनंदात असाल तर कृपया लग्नच करा. प्रेयसी असणाऱ्या लोकांमध्ये एक गैरसमज असतो, जो मी इथे सांगून माझे उत्तर पूर्ण करतो. माझी वाली इतरांपेक्षा वेगळी आहे असा विचार करू नका.'  
धोनीला या कार्यक्रमात 2023चा विश्वविजेता भारतीय संघ बनेल का याबाबत प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना त्याने म्हटले, 'भावना समजून घ्या, विद्यमान भारतीय संघ चांगला आहे. संघातील सर्वच खेळाडू अप्रतिम कामगिरी करत आहेत. याहून अधिक मी काही बोलू शकत नाही. समजणाऱ्याला इशारा पुरेसा असतो.' तसेच लोकांनी मला एक चांगला माणूस म्हणून लक्षात ठेवावं हिच माझी इच्छा असल्याचेही धोनीने यावेळी नमूद केले. धोनीने आयपीएल 2024 मध्ये खेळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 'मी केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, आयपीएलमधून नाही. इथे चेन्नई सुपर किंग्जचे देखील चाहते आहेत. गुडघ्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे आणि विश्रांती घेत आहे. डॉक्टरांनी सांगितले होते की, नोव्हेंबरपर्यंत बरे वाटेल. पण मला रोजच्या कामात कोणतीही अडचण येत नाही', असे धोनीने सांगितले. 

Mahendra Singh Dhonis relationship advice to bachelorsMS Dhonis Tumhari Wali Alag Hai Relationship Advice For Bachelors Goes Viral

Mahendra Singh Dhonis relationship advice

Former Indian skipper MS Dhoni valuable relationship insights

...तर कृपया लग्नच करा
प्रेमात पडणाऱ्या मुलांना कॅप्टन कूल धोनीचा मोलाचा सल्ला 

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm