29-year-old-actress-suchandra-dasgupta-dies-family-shocked-the-fans-are-sad-too-202305.jpeg | 29 वर्षीय अभिनेत्रीचं निधन, कुटुंबीयांना धक्का; चाहत्यांनाही दु:ख अनावर | belgaum news | belgavkar बेळगावकर

29 वर्षीय अभिनेत्रीचं निधन, कुटुंबीयांना धक्का;
चाहत्यांनाही दु:ख अनावर

belgavkar.com | belgaum | belgavkar

शुटींगवरुन घरी येत असताना अपघात


बंगाली सिनेजगतात दु:खदायक घटना घडली आहे. प. बंगालमधील सिने इंडस्ट्रीतील टेलिव्हीजन अभिनेत्री सुचंद्रा दासगुप्ता हिचं अपघाती निधन झालं, ती 29 वर्षांची होती. अभिनेत्रीच्या अकाली निधनाने तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. तर, अभिनेत्रीच्या मृत्युची बातमी पाहून चाहत्यांना दु : ख झालं आहे.  सुचंद्रा शनिवारी रात्री शुटींगवरुन घरी येत असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. शुटींगवरुन घरी येण्यासाठी मोबाइल अ‍ॅपवरुन सुचंद्रा यांनी बाईक बुक केली. या बाईकवरुन प्रवास करत असताना, एक सायकलस्वार वाटेत आडवा आला. त्यामुळे, दुचाकीस्वाराने अचानक ब्रेक दाबला.
दरम्यान, पाठीमागून येत असलेल्या एका ट्रॉलीने बाईकला जोरदार धडकी दिली. या अपघातामुळे अभिनेत्री सुचंद्रा बाईकवरुन खाली पडल्या. याचवेळी पाठीमागून येणाऱ्या ट्रकखाली आल्याने त्यांचा अपघाती मृत्यू झाला.  या अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली होती. तर, काही काळ वाहतूकही ठप्प झाली होती. परिसरात तणावाचे वातावरणही निर्माण झाले होते. अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली असून ट्रकही ताब्यात घेतला आहे. अभिनेत्री सुचंद्रा यांच्या निधनानंतर बंगाली फिल्म इंडस्ट्रीत शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. 
कोन होती सुचंद्र दासगुप्ता : सुचंद्रा दासगुप्ता ही पश्चिम बंगालच्या सिनेजगतातील प्रसिद्ध टेलिव्हीजन अभिनेत्री होती. तिने अनेक फेमस बंगाली टेलिव्हीजन शोमध्ये काम केलं होतं. गौरी मध्ये सपोर्टींग रोल केल्यानंतर तिला लोकप्रियता मिळाली होती. त्यामुळेच, तिचा फॉलोविंग वर्गही मोठ्या प्रमाणात होता. तिच्या अकाली निधनाने सर्वांनाच दु : ख झालं आहे.