मुंबई : विमानांमध्ये धिंगाणा घालण्याचे प्रकार सातत्यानं वाढत आहेत. दुबई-मुंबई (IndiGo Dubai-Mumbai Flight) विमानात 2 प्रवाशांनी दारू पिऊन राडा केला. तसेच विमानप्रवासात या दोन प्रवाशांनी सहप्रवासी आणि दोन क्रू मेंबरला देखील शिवीगाळ केली. या घटनेनंतर दोघांना मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर लगेचच अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांनी या संदर्भात तक्रार केली. त्यानंतर प्रवाशाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. दत्तात्रय बापर्डेकर आणि जॉन डिसूझा अशी प्रवासांची नावं आहेत. मुंबई विमानतळावरील सहार पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. दोन्ही आरोपींनी आधी सीटवर बसून मद्यपान केलं आणि नंतर विनाकारण विमानात फिरत होते, असं सहप्रवाशांनी सांगितलं आहे.
राडा घातल्याप्रकरणी दोघांना अटक : टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही प्रवासी वर्षभरापासून दुबईत होते. दुबईत एकत्र काम करत होते. मायदेशी वर्षभरानंतर परतल्याचा आनंद ते विमानात साजरा करत होते. दरम्यान प्रवाशांनी विमानप्रवासात गैरवर्तन केले. फ्लाईटमध्ये राडा होण्याचे हे सातवे प्रकरण आहे. लघुशंका प्रकरणानंतर अनेक प्रकरणं समोर आली. सहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुबई-मुंबई विमानात दारू पिऊन धिंगाणा घातल्याप्रकरणी दोन प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. या दोन प्रवाशांविरोधात कलम 336 आणि विमानप्रवासाशी संबंधित कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सहप्रवाशांना शिवीगाळ : सहार पोलिसंनी दिलेल्या माहितीनुसार, विमानप्रवासात या दोन प्रवाशांना दारू पिण्यास सहप्रवाशांनी मनाई केल्यानंतर या प्रवाशांनी शिवीगाळ केली. तसेच दारू पिणे सुरूच ठेवले. जेव्हा एअरलाईन्स कर्मचाऱ्यांनी त्यांच्या जवळील बॅगमधील दारूची बॉटल घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांना देखील शिवीगाळ केली.
विमान प्रवासात गोंधळ घातल्याचे सातवे प्रकरणविमान प्रवासात गैरवर्तन केल्याचे हे सातवे प्रकरण आहे. काही दिवसांपूर्वी 11 मार्चला रत्नाकर द्विवेदी या अमेरिकी नागरिकाने लंडन-मुंबई प्रवासादरम्यान सिगरेट ओढण्यास मनाई केल्यानंतर त्याने जबरदस्तीने एमर्जन्सी एग्झिटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्यानंर त्याला अटक करण्यात आली. 14 मार्चला प्रवाशाची 25 हजाराच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली. त्यानंतर तो पुन्हा अमेरिकेला गेला. महत्त्वाची बाब म्हणजे, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं (DGCA) टाटा समूहाच्या मालकीच्या विमान कंपनीला (एअर इंडिया) गेल्या काही दिवसांत दोन आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये प्रवाशांशी असभ्य वर्तन केल्याबद्दल दंड ठोठावला आहे. सुधारित धोरणात नेमका काय बदल झालाय, हे अद्याप सविस्तरपणे सांगण्यात आलेलं नाही.
- कर्नाटक : ब्रेकअप, भेट अन् भांडण; माजी प्रेयसीचा जीव घेऊन वेगळाच बनाव रचण्याचा प्रयत्न; अपयश येताच...
- पावसापेक्षाही ओव्हलवर मोठे संकट घोंघावतेय...! WTC फायनलसाठी 2 खेळपट्ट्या;
- “दुकाने रिकामी करा, अन्यथा…”, ‘लव्ह जिहाद’च्या संशयावरून उत्तरकाशीत 35 दुकानदारांना धमकी
- बेळगाव : बेळगाव जिल्ह्याचे विभाजन आवश्यक