बेळगाव : प्रभूनगर येथे 5 लिटर गावठी दारू जप्त

belgavkar.com | belgaum | belgavkar


बेळगाव-खानापूर : प्रभूनगर (ता. खानापूर) गावाजवळ खानापूर पोलिसांनी मंगळवारी छापा टाकून 5 लिटर गावठी दारूचा साठा जप्त केला. प्रभूनगर (ता. खानापूर) येथे प्रभूदेव मंदिराच्या परिसरात सार्वजनिक ठिकाणी गावठी दारूची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 5 लिटर गावठी दारू जप्त केली व आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
सीपीआय रामचंद्र नाईक यांनी बैलहोंगल डीएसपी रवी नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रकाश राठोड व सहकाऱ्यांनी सापळा रचून घटनास्थळी छापा टाकला.