the-house-fire-incident-took-place-in-jere-galli-in-angol-belgaum-belgaum-बेळगाव-belgavkar-house-fire-jere-galli-in-angol-belgaum-202303.jpg | बेळगाव : अनगोळमध्ये घराला आग; | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : अनगोळमध्ये घराला आग;

belgavkar.com | belgaum | belgavkar


बेळगाव : देव्हाऱ्यातील पेटत्या दिव्यामुळे घराला आग लागल्याची घटना बुधवारी अनगोळमधील जेरे गल्लीत घडली. या दुर्घटनेत 50000 रुपयांचे जीवनावश्यक साहित्य जळाल्याचा अंदाज अग्निशामक दलाने वर्तविला आहे. याबाबत अग्निशामक दलाकडून मिळालेली अधिक माहिती अशी, निलेश सांबरेकर यांचे जेरे गल्लीत घर आहे.
बुधवारी गुढीपाडव्याच्या निमित्ताने देवपूजा करुन त्यांनी देव्हाऱ्यात दिवा पेटवून ठेवला होता. त्यानंतर सर्व कुटुंबीय घराबाहेर गेले होते. दुपारी 12.30 च्या सुमारास देव्हाऱ्यातील दिवा पडल्यामुळे आग पसरली. घरात कुणीच नसल्याने आगीची घटना वेळीच लक्षात आली नाही. घरातून धुराचे लोळ उठल्यानंतर आग लागल्याचे आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात आले. तोवर घरातील जीवनावश्यक साहित्याने पेट घेतला होता.