बेळगाव अर्थसंकल्प : मालमत्ता करातून सर्वाधिक 62 कोटी रुपयांचा महसूल मिळणार #budget

belgavkar.com | belgaum | belgavkar

स्वच्छतेसाठी महिन्याला सव्वाचार कोटी;
व्यापार परवान्यातून यंदा 2 कोटी रुपयांचा महसूल

बेळगाव : यंदाच्या अर्थसंकल्पात स्वच्छ बेळगावचा नारा देण्यात आला असून त्यासाठी तब्बल 52 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याचाच अर्थ बेळगावच्या स्वच्छतेवर महिन्याला सव्वाचार कोटी आणि रोज 14 लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. 2018 साली हा खर्च 26 कोटी होता. म्हणजेच 5 वर्षांत फक्त कचरा उचलीचा खर्च दुप्पट झाला आहे. तरीही बेळगाव शहरात स्वच्छता नसतेच, हे नेहमीचे दुखणे. महापालिकेला प्रामुख्याने मालमत्ता करातून सर्वाधिक 62 कोटी रुपयांचा महसूल मिळणार असून तब्बल 484 कोटी 15 लाख 57 हजार रुपयांचा अर्थसंकल्प सोमवारी सभागृहात मंजूर करण्यात आला. यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ करण्यात आली नाही, ही बेळगावकरांसाठी एकच समाधानाची बाब.
महापालिका सभागृहात सोमवारी अर्थसंकल्प मंजुरीसाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. स्थायी समिती निवडणूक झाली नसल्यामुळे महापौर शोभा सोमनाचे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आयुक्त डॉ. रूद्रेश घाळी यांनी अर्थसंकल्प सभागृहासमोर मांडला. 2023-24 वर्षातील या अर्थसंकल्पात एकूण 484 कोटी 15 लाख 57 हजार रुपयांची मिळकत असून 484 कोटी 9 लाख 75 हजार रुपयांचा नियोजित खर्च असणार आहे. अर्थसंकल्पात प्रामुख्याने स्वच्छ बेळगावचा नारा देण्यात आला आहे. अर्थसंकल्पातील सर्वाधिक खर्च स्वच्छतेवर करण्यात येणार आहे. तरतुदीनुसार 26 कोटी रुपये कचरा विल्हेवाटीसाठी असणार आहे.
नोंदणी कार्यालयातून अधिभार रुपाने 1 कोटी 10 हजार रुपये मिळतील. विकास शुल्कातून 8 कोटी 60 हजार रुपये, बेटरमेंट शुल्कातून 51 लाख, बांधकाम अवशेष विल्हेवाटीतून 2 कोटी 26 राख, बांधकाम परवान्यातून 3 कोटी 27 लाख, हेस्कॉमकडून थकीत 17 कोटी रुपये मिळतील, अशी अपेक्षाही महापालिकेला आहे. व्यापार परवान्यातून यंदा 2 कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे. वाहनतळ शुल्कातून 40 लाख मिळणार आहेत. महापालिकेच्या रिक्त 40 जागांच्या विक्रीतून 20 कोटी रुपयांचा महसूल मिळेल, अशी अपेक्षा महापालिकेला आहे. त्यामुळे महापालिकेचा महसूल रिक्त जागांवर असणार आहे.
तर भूभाडे वसुलीतून 17 कोटी 55 लाख आणि जाहिरात शुल्कातून 90 लाख रुपयांची अपेक्षा महापालिकेला आहे. अर्थसंकल्प बैठकीत भांडवली खर्चाबाबत माहिती दिली. त्यामध्ये पंधराव्या वित्त आयोगाकडून 23 कोटी 24 लाख रुपये निधी उपलब्ध झाला असून तो पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, सांडपाणी निचरा, रस्ते, पदपथ निर्मिती, स्मशान कामे यावर खर्च करण्यात येणार आहे.

belgaum municipal corporation budget corporators

belgaum budget property tax will get maximum revenue of rs 62 crore budget

belgaum belgaum budget

बेळगाव अर्थसंकल्प : मालमत्ता करातून सर्वाधिक 62 कोटी रुपयांचा महसूल मिळणार #budget
स्वच्छतेसाठी महिन्याला सव्वाचार कोटी; व्यापार परवान्यातून यंदा 2 कोटी रुपयांचा महसूल

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm