chatrapati-shivaji-maharaj-offensive-photo-belavadi-mallamma-congress-bindugowda-202102_1.jpg | छत्रपती शिवरायांच्या बद्दल अपमानकारक पोष्ट करणार्‍या कर्नाटकातील बिंदू गौडा या महिलेवर सायबर अंतर्गत गुन्हा दाखल - | belgaum news | belgavkar बेळगावकर

छत्रपती शिवरायांच्या बद्दल अपमानकारक पोष्ट करणार्‍या कर्नाटकातील बिंदू गौडा या महिलेवर सायबर अंतर्गत गुन्हा दाखल -

belgavkar.com | belgaum | belgavkar

पुणे : कर्नाटकातील काँग्रेसच्या महिला पदाधिकारी बिंदू गौडा यांनी आपल्या फेसबुक पेज वरुन कोणताही ऐतिहासिक पुरावा नसतांना छत्रपती शिवाजी महाराज व बेलवडी (ता. बैंलहोंगल, बेळगाव) येथील मलम्मा यांच्या युद्ध संदर्भ चुकीच्या पद्धतीने मांडून आपत्तीजनक चित्रासह मजकूर लिहला यावर समाज माध्यमातून खुप मोठ्या प्रमाणावर त्यांच्यावर त्यांनी केलेल्या टिप्पणीवर टिका झाली.
याबाबत ‌अधिक माहिती देतांना क्षत्रिय जनसंसद लिगल सेल प्रदेशाध्यक्ष अँड. उर्मिल‍ा जाधव म्हणाल्या की, छ. शिवाजी महाराज व मलम्मा यांच्यातील युद्ध प्रसंग व मलाम्मांना अभय देत दिलेले त्यांना परत राज्य हा भक्कम इतिहास असताना चुकीचा काल्पनिक इतिहास रंगवत आहेत या विरोधात योग्य त्या कायदेशीर कारवाई करु. यावर राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसद महाराष्ट्र प्रांत संघटनेने हरकत घेत यावर जोेदार विरोध प्रदर्शन केले. व या महिलेने जाणीवपूर्वक दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी व समाजिक सलोखा भंग व्हावा म्हणूनच अशा प्रकारे सामाजिक माध्यामातून पोष्ट केली आहे. त्यावर गुन्हा नोंद व्हावा. यासाठी म्हणून क्षत्रिय जनसंसदेचे लिगल सेल प्रदेशाध्यक्ष अँड. उर्मिला जाधव पाटील, क्षत्रिय जनसंसदेचे महाराष्ट्र प्रांत महासचिव संतोषराजे गायकवाड तसेच क्षत्रिय जनसंसदेचे मीडिया प्रभारी सुधीर साळुंखे यांनी आज कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
यासह क्षत्रिय जनसंसदचे महासचिव संतोषराजे गायकवाड म्हणाले की, गेल्या काहीवर्षात समाज माध्यमातून आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे अवमानकारक मजकूर टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. याबद्दल याविरोधात फक्त निषेधच व्यक्त केला जात होता. पुढील कोणत्याही प्रकारची कारवाई होत नव्हती. परंतु येथून पुढे राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसद जातीने लक्ष घालत या मनोविकृतीला चाप बसवणार आहे असे बोलतांना म्हणाले. याबाबत क्षत्रिय जनसंसदचे राष्ट्रीय सभापती महेश पाटील बेनाडीकर यांनी याबाबत मोठी मोहीम उभारु व इतिहासाचे विकृतीकरण व मोडतोड थांबवू असे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्त्रीजातीबद्दल आदर सर्वश्रूत आहे मग तो कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला त्यांनी मानसन्मान देऊन परत पाठविले. तसेच रांझेगावाच्या पाटलाला त्यांनी हातपाय तोडण्याची शिक्षा अमलात आणून स्वराज्यात स्त्रीयांना सन्मानाची वागणूक व स्त्रियांना अभय दिले. असे असंख्य पुरावे इतिहासात आहेत.