belgaum-dc-nivedan-take-action-youth-death-army-training-school-angol-belgaum-202101.jpg | बेळगाव : त्या आर्मी प्रशिक्षण केंद्राविरूद्ध आंदोलन; दगडफेकही झाल्याने काही काळ तणाव; | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : त्या आर्मी प्रशिक्षण केंद्राविरूद्ध आंदोलन; दगडफेकही झाल्याने काही काळ तणाव;

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : मुलाच्या आत्महत्येला अनगोळमधील शिवशक्ती गुरुकुल अकादमी कारणीभूत असल्याचा आरोप करत मृत मुलाचे कुटुंबीय व विविध संघटनांनी बुधवारी (24 फेब्रुवारी) आंदोलन केले. या वेळी संस्थेच्या इमारतीवर दगडफेकही झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, टिळकवाडी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. अनगोळला शिवशक्ती गुरुकुल या नावाची सैन्यदल प्रशिक्षण संस्था आहे. मंडोळीतील लता यांचा मुलगा असणारा रोहित रमेश तळवार (वय 20, हा अनगोळ येथील एका खासगी शिक्षण संस्थेमध्ये आर्मी आणि पोलिस भरतीसाठी प्रशिक्षण घेत होता. पण, संस्थेकडून झालेल्या मानसिक छळामुळे त्याने 12 जानेवारीला आत्महत्या केल्याचा आरोप तळवार कुटुंबियांने केला आहे.
तसेच मुलाने आत्महत्या केली नसून त्याचा खून झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. घटनेची नोंद टिळकवाडी पोलीस ठाण्यात झाली असून चौकशी सुरु आहे. काही दिवसांपूर्वी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. पण, न्याय मिळत नसल्याचा आरोप करत मुलाच्या आईसह नातेवाईकांनी बुधवारी संस्थेच्या आवारात जाऊन जोरदार निदर्शने केली. तसेच बँड वाजवून निषेधही नोंदविला. माझ्या मुलाने आत्महत्या केल्याचे केल्याचे भासविले जात आहे. पण, त्यात तथ्य नाही. संस्थेकडून मुलाला छळले जात होते. यामुळे कारवाई केली जावी, अशी मागणी रोहितच्या आईने केली.
यावेळी संतप्त आंदोलकांनी दगडफेक केली. त्यामुळे, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. यासंदर्भात टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांकडे चौकशी केली असता त्यांनी घटनास्थळी थोडा वेळ तणाव होता. पण, परिस्थिती नियंत्रणाखाली आणल्याचा दावा केला. मुलाच्या आत्महत्याप्रकरणी न्याय न मिळाल्यास आपण मिलटरी भरती कोचिंग सेंटरसमोरच विष प्राशन करु, असा इशारा मुलाच्या आईने दिला. या आंदोलनात विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.