belgaum-kudremani-village-over-25-to-30-Indian-gaur-bison-kudremani-village-of-belgav-202101.jpg | बेळगाव : कुद्रेमनी गावामध्ये भरदिवसा तब्बल 25 ते 30 गव्यांचा मुक्त संचार VIDEO | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : कुद्रेमनी गावामध्ये भरदिवसा तब्बल 25 ते 30 गव्यांचा मुक्त संचार VIDEO

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव तालुक्यातील कुद्रेमनी गावाच्या शिवारात गव्यांनी मंगळवारी रात्री आणि आज (बुधवार दि. 27) जवळपास 25 ते 30 गव्यांनी थैमान घातले. गावच्या आसपास काजूची झाडे अधिक प्रमाणात आहेत. यामुळे हा परिसर जंगल सदृश्य बनला आहे. यामध्ये गव्यांचा संचार वाढला असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नुकसानीने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतातील संपूर्ण पिके उद्ध्वस्त करीत असल्याने शेतकर्‍यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे.
YouTube Video

मंगळवारी रात्री गव्यांचा कळप गावात शिरला होता. रात्रभर पिकांची त्याने नुकसान केले होते. त्यानंतर आज बुधवारी दुपारपर्यंत गव्यांचा परिसरात वावर होता. याकडे वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. यामुळे ग्रामस्थांना खबरदारी घेत गव्यांना हाकलून लावण्यासाठी प्रयत्न करावे लागले.
YouTube Video

वनखाते हातावर हात धरून बसले असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. गवे रेड्यांच्या बंदोबस्तासाठी वनखात्याने तत्काळ उपाययोजना करावी. जंगलात चारा उपलब्ध होत नसल्याने जंगली जनावरांची जगण्या-मरण्याची धडपड सुरू आहे. वनखात्याकडून पर्यावरणाच्या झालेल्या हानीकडे आणि वन्यजिवांच्या उपजिविकेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. रात्री काही शेतकरी पिकांची राखण करण्यासाठी शेतावर जातात. गव्यांचा कळप आल्यास हाका घालणे, फटाके वाजविणे असे प्रकार करतात. मात्र गवे न घाबरता माणसांच्या दिशेने येतात. त्यामुळे वनविभागाने गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.