news.jpg | तवंदी घाटात जनावर आडवे आल्याने दुधाचा टँकर पलटी... | belgaum news | belgavkar बेळगावकर

तवंदी घाटात जनावर आडवे आल्याने दुधाचा टँकर पलटी...

belgavkar.com | belgaum | belgavkar


पुणे-बेंगळुर राष्र्टीय महामार्गावरील (NH4 Highway) कोल्हापुर जिल्ह्यातील तवंदी घाटात जनावर आडवे आल्याने दुधाचा टँकर पलटी झाल्याची घटना सोमवार (दि. 29 जुलै) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात 30000 लीटर दुध वाया गेले असुन सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दुधाने भरलेला टँकर हसनहून पुण्याकडे निघाला होता. यावेळी तवंदी घाटात अचानक टँकरच्या आडवे जनावर आले. यावेळी या जनावरला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा टँकरवरील ताबा सुटून टँकर पलटी होवुन हा अपघात घडला.