chikodi-taluka-gram-panchayat-reservation-sarpanch-president-belgaum-202101.jpg | बेळगाव : चिकोडी तालुका ग्रामपंचायत; अध्यक्ष उपाध्यक्ष आरक्षण जाहीर | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : चिकोडी तालुका ग्रामपंचायत; अध्यक्ष उपाध्यक्ष आरक्षण जाहीर

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : चिकोडी तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या व अनेक सदस्यांना प्रतीक्षा असलेल्या ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर झाले. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, प्रांताधिकारी युकेशकुमार, तहसीलदार सुभाष संपगावी यांनी पंचायत सदस्यांसमोर आरक्षण जाहीर केले. तालुक्यात 36 पंचायतींसाठी आरक्षण जाहीर झाले असून अध्यक्षपदासाठी 10 पंचायतींसाठी सामान्य आरक्षण आले आहे. 8 ठिकाणी सामान्य महिला, 4 पंचायतींवर ओबीसी अ तर 4 पंचायतींवर ओबीसी अ वर्गातील महिला अध्यक्षपदी विराजमान होतील. ओबीसी ब या वर्गातून एक महिला व एक पुरुष यांना अशा दोन पंचायती राखीव आहेत. एससी गटासाठी 3 पंचायती तर एससी महिला गटासाठी 5 पंचायतींवर अध्यक्षपदाच्या जागा आरक्षित आहेत. एका एसटी महिलेलाही एक पंचायतीवर अध्यक्ष होण्याचा मान मिळेल.
उपाध्यक्षपदासाठीही असेच आरक्षण असून बहुतांश ठिकाणी रोटेशन पद्धतीने वर्गवारी आहे. चिकोडी - अंकली रोडवरील परटी नागलिंगेश्वर सभागृहात सोडतीची तयारी केली होती. त्यानुसार बहुतांश पंचायतींचे सदस्य हजर होते. काही ठिकाणी सत्ताधारी सदस्यच अधिक आल्याचे दिसून आले. अध्यक्ष - उपाध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर होताच त्या - त्या गावचे सदस्य गावाकडे रवाना झाले. अनेकजणांनी अध्यक्षपदासाठी नियोजन करून ठेवले असतानाही आरक्षण न आल्याने त्यांची नाराजी दिसून आली. बहुतांश गावांत चित्र स्पष्ट असल्याने अध्यक्ष - उपाध्यक्ष कोण होणार, हे स्पष्ट झाले आहे. काही त्रिशंकू व काठावर बहुमत असलेल्या ठिकाणी फोडाफोडीचे राजकारण रंगेल.