BJP_Bharatiya_Janata_Party.jpeg | बेळगावात होणार भाजपाची महत्वाची बैठक; | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगावात होणार भाजपाची महत्वाची बैठक;

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव शहरामध्ये भाजपाचे कर्नाटक राज्याध्यक्ष नलीन कुमार कटील यांच्या अध्यक्ष्यतेखाली शनिवारी (23 जानेवारी) भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी राज्याध्यक्ष नलीन कुमार कटील हे बेळगाव दौऱ्यावर येणार आहेत.
या बैठकीत बेळगाव लोकसभा पोटनिवडणुक उमेदवारी तसेच इतर महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांच्या प्रवास दौऱ्याच्या यादीत राज्याध्यक्ष नलीन कुमार कटील हे दुपारी बेळगावमध्ये दाखल होणार असून दुपारी 3.30 दरम्यान हॉटेल संकम येथे हि बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उमेश कत्तीदेखील सहभागी होणार आहेत.