belgaum-amit-shah-tour-belgaum-communication-activist-belgaum-202101.jpg | बेळगाव : मेळाव्यातील गर्दीत कोरोना चिरडला... पण बेळगाव जिल्ह्यातील तीन मंदिर बंदच | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : मेळाव्यातील गर्दीत कोरोना चिरडला... पण बेळगाव जिल्ह्यातील तीन मंदिर बंदच

belgavkar.com | belgaum | belgavkar

मुख्यमंत्री बदलावर अमित शहांची प्रतिक्रिया

बेळगाव : भाजपतर्फे आयोजित बेळगाव शहरातील जनसेवक मेळाव्याच्या समारोपात आज (17 जानेवारी) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बोलत होते. कोरोनाच्या संकाटात कार्यकर्त्यांनी कचाकच भरलेल्या बेळगाव जिल्हा क्रिडांगणावरील व्यासपीठावर शहा यांनी भाषण केले. एकीकडे ( बेळगावात कोरोना आहे म्हणतात बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती रेणुका यल्लम्मा देवी मंदिर, जोगुळभावी सत्यव्वादेवी मंदिर आणि रायबाग येथील चिंचली मायक्का देवी मंदिर बंदचा आदेश तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादनसाठी दरवर्षी निघणार्‍या फेरीस अनुमती नाकारण्यात येते तर दुसरीकडे लाखोंच्या गर्दीत भाजपाचा मेळावा होतो.) देशात पंतप्रधान नरेंद्र आणि राज्यात मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांची डबल इंजिन जोडी प्रभावी ठरल्याचे गौरद्‌गार काढत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाबाबत सुरु असलेल्या चर्चेतील हवाच काढून घेतली आहे.
देशात मोदी आणि राज्यात येडियुराप्पा यांची कामगिरी उत्तम सुरु आहे. यापुढेही त्यांच्या नेतृत्वाखाली विकास अधिक रचनात्मक स्वरुपात घडेल. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश प्रगतीपथावर वाटचाल करतो आहे. विविध क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भरतेचा मार्ग निवडून विकासाची वाटचाल सुरू आहे. संपूर्ण देशाचा सर्वदृष्टीने विकास करून जगामध्ये महासत्ता बनण्याचे भारताचे स्वप्न नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली साकार होईल, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. भाषणात त्यांनी विरोधीपक्ष काँग्रेसवर चौफेर टीका केली. सोनिया गांधी आणि मनमोहनसिंग सरकारचा कार्यकाळ निष्क्रीय ठरली असल्याचेही ते म्हणाले.
ते म्हणाले, 'ग्रामपंचायतीत पक्षाची उल्लेखनीय कामगिरी झाली आहे. विधानसभा, लोकसभा निवडणुकीत मतदारांनी पक्षाला भरगोस यश मिळवून दिले आहे. कार्यकर्त्यांचा हा नरेंद्र मोदी यांच्याप्रती दाखविलेला विश्‍वास आहे. देशाला स्वतंत्र मिळाल्यानंतर कोणीही काश्‍मिर प्रश्‍नाला स्पर्श केला नव्हता. पण, भाजपने दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर 375 कलम आणि 35 'अ' कलम रद्द केले. राममंदिर उभारणी कार्य सुरु केले. तलाख संदर्भात निर्णय घेतला. देशाच्या सीमा अधिक सुरक्षित केल्या. आतंकवाद्यांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईकचा हल्ला घडविला. ई - ग्रामपंचायत, ई - ब्रॉंडबण्ड सेवा जोडल्या. यामुळे युवकांना रोजगार मिळत आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री कै. सुरेश अंगडी, भाजपा सरचिटणीस राजू चिकनगौडर तसेच कार्यकर्ते रवी हिरेमठ यांच्या निधनाबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला.