बैलगाडीतून तब्बल 14 टन ऊसाची वाहतूक!

बैलगाडीतून तब्बल 14 टन ऊसाची वाहतूक!

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात ऊस वाहतुकीच्या वेळी शेतकऱ्यांमध्ये बैलगाडीतून कोण अधिक ऊस नेतो याच्या पैजा लागतात. एका शेतकऱ्याने एका बैलगाडीतून तब्बल 14 टन ऊसाची वाहतूक केली आहे. बैलगाडी वाहणाऱ्या बैलावर ओझे किती लादायचे याचा विचार शेतकऱ्यांनी करणे आवश्यक आहे. कर्नाटकात बैलगाडी, ट्रक आणि ट्रॅक्टरमधून ऊस वाहतूक केली जात आहे. मंड्या जिल्ह्यातील जिंगूडीपट्टण येथील एका शेतकऱ्याने बैलगाडीतून 14 टन उसाची वाहतूक केली आहे. याचा व्हिडीओ सध्या कर्नाटकात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रंजू नावाच्या शेतकऱ्याच्या बैलगाडीतून बोगेगौडा या शेतकऱ्याने 14 टन ऊस नेण्याचा विक्रम केला आहे. एखादा ट्रक जितका ऊस नेतो तितका ऊस बैलगाडीतून नेण्यात आला. ट्रॅक्टरमधून 6 ते 7 टन तर ट्रकमधून 10 ते 15 टन वाहतूक केली जाते. पंरतु जेवढा टन ऊस ट्रकमधून वाहून नेला जातो तेवढ्याच ऊसाची वाहतूक या शेतकऱ्याने बैलगाडीतून केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
हा ऊस नेला जात असताना रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी हे दृश्य पाहण्यासाठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे वे ब्रिजवर वजन करुन नोंद करण्यात आली होती. परंतु बैलगाडीतून क्षमतेपेक्षा जास्त ऊसाची वाहतूक केल्याने अपघातांनाही निमंत्रण मिळतं. याशिवाय बैलांना होणारा त्रास वेगळेचा. बऱ्याच घटनांमध्ये अशी वाहतूक करण्यासाठी बैलगाडीला जुंपणाऱ्या बैलांचा जीव गेल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे अशा नसतं धाडस आणि पैजांमुळे मुक्या प्राण्यांना त्रास होतो किंवा त्यांचा नाहक बळी जातो.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बैलगाडीतून तब्बल 14 टन ऊसाची वाहतूक!

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm