belgaum-khanapur-nandgad-village-tree-fallen-road-202011.jpg | बेळगाव :  खानापूर मार्गावर भलामोठा वृक्ष कोसळला; दोघेजण सुदैवाने बचावले | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : खानापूर मार्गावर भलामोठा वृक्ष कोसळला; दोघेजण सुदैवाने बचावले

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. खानापूर : खानापूर नंदगड मार्गावरील लालवाडी क्रॉसजवळ भलामोठा वृक्ष उन्मळून रस्त्यावर कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक तब्बल तीन तास ठप्प झाली होती. रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीवरील दोघेजण केवळ दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने बचावले. दोघांनाही किरकोळ दुखापत झाली. लालवाडी व नावगा यादरम्यान रविवारी दुपारी जीर्ण झालेले आंब्याचे झाड रस्त्यावर कोसळले. रविवार असल्यामुळे या मार्गावरून वाहनांची मोठी वर्दळ होती.
यावेळी खानापूर येथील शशिधर सोनोळी हे आपल्या मजुरासोबत हलशी येथील शेताकडून परत येत होते. झाडाखाली त्यांची दुचाकी सापडली. सुदैवाने अजस्त्र बुंध्यापासून अवघ्या झाडांच्या फांद्यांखाली सापडून त्यांच्या हाताला दुखापत झाली. नंदगड पोलिस व खानापूर वनविभागाला याबाबत माहिती देण्यात आली. अडथळ्यामुळे वाहनांची लांबच लांब रांग लागली होती. खानापूरच्या बाजाराला जाणाऱ्या नागरीकांची गैरसोय झाली.