kesti-village-hukkeri-youth-kharoshi-death-accident-electricity-water-motor-shock-hukkeri-belgaum-202011.jpg | बेळगाव : पाण्याच्या मोटारीचा शाॅक बसल्याने मुलाचा मृत्यू | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : पाण्याच्या मोटारीचा शाॅक बसल्याने मुलाचा मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

विद्युत मोटर सुरू करताना विजेचा धक्का बसल्याने मृत्यू

बेळगाव ता. हुक्केरी : केस्ती (ता. हुक्केरी) येथील श्रीशैल खरोशी (वय 15) या मुलाचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, श्रीशैल शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता पाण्याची विद्युत मोटर सुरू करत होता. यावेळी मोटरीतून विजेचा जोरदार धक्का बसल्याने श्रीशैलचा जागीच मृत्यू झाला. श्रीशैल केस्ती सरकारी हायस्कूलमध्ये दहावीत शिकत होता.
याप्रकरणी वडील रामचंद्र नारायण खरोशी यांनी फिर्याद संकेश्वर पोलिसांत दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक जे. बी. कोगेनहळ्ळी यांनी घटनास्थळी भेट देवुन पंचनामा केला.