khanapur-taluka-belgaum-youth-fallen-death-drink-gutter-202011.jpg | बेळगाव : तरुणाचा गटारीत पडून मृत्यू | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : तरुणाचा गटारीत पडून मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. खानापूर : 35 वर्षीय तरुणाचा गटारीत पडून मृत्यू झाल्याची घटना फिश मार्केटजवळ उघडकीस आली. परशराम नारायण पाटील (वय 35, रा. बेकवाड ) असे या तरुणाचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी तो महाराष्ट्रात राहणाऱ्या भावाकडून गावी जाण्यासाठी निघाला होता. दरम्यान, रविवारी सकाळी येथील फिश मार्केटच्या बाजूला गटारीत एकाचा मृतदेह आढळला. सोशल मीडियावर या घटनेचे फोटो व्हायरल झाले.
तो परशराम असल्याचे निष्पन्न झाले. नातेवाईकांनी ओळख पटविल्यानंतर मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला. मद्यप्राशनानंतर तो गटारीत पडून बुडाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. खानापूर पोलिसात घटनेची नोंद झाली आहे. मृत परशरामच्या मागे आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.