two-youth-drowned-khanapur-belgaum-202011.jpg | बेळगाव : खानापूरातील 2 युवक बुडाले | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : खानापूरातील 2 युवक बुडाले

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. खानापूर : (शनिवारी 14 नोव्हेंबर) बेपत्ता झालेले 2 युवक शेडेगाळी गावाजवळ हलात्री नाल्यात बुडाल्याची घटना उघडकीस आली आहे. अरफत शाकीदअली आरकट्टी (वय 16, रा. जळकावाडा, खानापूर) आणि उमेर मुस्ताक खलिफा (वय 16, रा. बाजारपेठ, खानापूर) अशी त्यांची नावे आहेत. हलात्री-मलप्रभेच्या संगमाजवळ त्या दोघांचे कपडे आणि मोबाईल आढळून आले.
शनिवारी ते दोघे हलात्रीत पोहायला गेले असताना ही घटना घडली. त्यानंतर त्यांच्या कुटूंबीयांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांचा शोध लागला नाही. आज रविवारी दुपारी ते हलात्रीत पोहयला गेल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांचा हलात्रीच्या काठावर शोध घेण्याचा प्रयत्न कुटूंबीयांनी केला. आढळलेले त्यांचे कपडे आणि मोबाईल यावरून ते पाण्यात बुडाल्याची शहानिशा झाली असून शोध घेतला जात आहे. त्यावरून ते हलात्री नाल्यात बुडाल्याची खात्री झाली आहे. अजूनही त्या दोघांचा शोध घेतला जात आहेत.