बेळगाव : एपीएमसी पोलिस स्टेशन सीपीआय जावेद मुशाफुरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तक्रार नोंदवल्यानंतर अवघ्या 6 तासात चोरीचे प्रकरण सोडविले आहे. आझाद को-ऑफ हाऊसिंग सोसायटीचे योगेश भरत छाबरा (आठवा क्रॉस, कुवेम्पू नगर) यांचे भातकंडे गल्लीत प्लायवुडचे दुकान आहे. 5,50,000 रुपये व्यापाराचे पैसे 11 नोव्हेंबर रोजी त्यांनी घरातील कपाटात ठेवले होते. दुसर्या दिवशी जेव्हा बँकेत पैसे जमा करण्यासाठी शेल्फ उघडले तेव्हा 5,50,000 रुपयांपैकी केवळ 1 लाख रुपयेच होते.
यामुळे 15 नोव्हेंबरला एपीएसएम पोलिस स्थानकात पैशाच्या चोरीबद्दल तक्रार दिली. एपीएमसी सीपीआय जावेद मुशापुरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत घराच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. घरमोलकरणींची चौकशी केली असता कबूल केले की घरी घरातील 5.50 लाख रुपयांपैकी 4.50 लाखांची चोरी केली होती.
- बेळगाव : धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या
- बेळगाव : NH4 वर अपघातामुळे काचांचा खच
अटक केलेल्या आरोपींची नावे मरियम्मा बाबू पारशीपोगू (रा. बंजारा कॉलनी 1 ला क्रॉस आणि अनिता यल्लप्पा कांबळे (रा. जनता कॉलनी, बाची) अशी आहेत. 4.5 लाख रूपये चोरीचे योगेश यांना परत देण्यात आले आहेत.