श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेतर्फे प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही गडकोट मोहिम अर्थात धारातीर्थ यात्रे ची घोषणा झालेली आहे.
किल्ले श्री लोहगड ते किल्ले श्री भीमगड असा मोहिमेचा मार्ग असुन ही मोहिम राजमाचीगड मार्गे असणार आहे.
मोहिमेचा कालावधीशुक्रवार, दिनांक 23 जानेवारी 2026 तें सोमवार, दिनांक 26 जानेवारी 2026 पर्यंत
मोहिमेचे प्रारंभस्थान : दुर्ग श्री लोहगड, जि. पुणे
श्री लोहगडापर्यंत पोहोचण्याचा मार्ग पुणे मुंबई जुन्या महामार्गावरील मळवली रेल्वे स्थानकावरुन भाजे या गांवी पोहोचावे. तेथेच वाहन तळाची व्यवस्था केली आहे. तेथूनच श्रीलोहगडावर यावे.
प्रारंभस्थानी पोहोचण्याची वेळ शुक्रवार, दि. 23 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या आंतच श्री लोहगडावर पोहोचावे. दुपारी ठिक 12. 00 वाजतां, श्री तुळजामातेच्या आरतीनें मोहिमेचा शुभारंभ होईल.
लोहगड किल्ला हा पुणे जिल्ह्यामध्येलोहगड किल्ला लोणावळा शहराच्या जवळ आहेलोहगड किल्ला महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा ऐतिहासिक किल्ला
भीमगड किल्ला (ज्याला भिवगड असेही म्हणतात) हा रायगड जिल्ह्यात, कर्जतजवळ आहे
छत्रपती शिवाजी महाराजांंच्या वृत्तीची तरुण पिढी निर्माण करण्यासाठी आणि तरुण पिढीला ध्येयवादी बनवण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने प्रतिवर्षी धारातीर्थ यात्रा (गडकोट मोहीम) आयोजित केल्या जातात. प्रत्येक वर्षी नवरात्रात शेवटच्या दिवशी म्हणजे दसर्याची दिवशी पू. संभाजीराव भिडे गुरुजी मोहिमेची घोषणा करतात.
आता सर्व शिवप्रेमींची उत्सुकता संपली असून वर्ष 2026 ची धारातीर्थ यात्रा अर्थात् मोहीम ही दुर्ग श्री लोहगड ते श्री भीमगड मार्गे श्री राजमाचीगड अशी होईल, असे भिडे गुरुजी यांनी सांगलीत घोषित केले आहे.
हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या श्री रायगडावर उभारण्यात येणाऱ्या 32 मण सुवर्ण सिंहासनाला ‘खडा पहारा’ देण्यासाठी धारकर्यांना मार्गदशन करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
खडतर अशा मार्गातून दर्याखोर्यांमधून, खाचाखळण्यांमधून, उघड्यावर झोपणे, अविश्रांत चालणे, ऊन-वारा यांची तमा नाही. चार दिवस सर्व थरांमधील धारकरी एक येतात. त्यामुळे या मोहिमेची प्रत्येक धारकरी-शिवप्रेमी आतुरतेने वाट पहात असतात. अखेर या मोहिमेची घोषणा झाल्यामुळे धारकर्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे.
गडकोट म्हणजे शिवरायांचे सद्यस्थितीतील स्वरुप आहे. अनेक मावळे आणि क्रांतीकारक यांचे रक्त या ठिकाणी सांडले आहे. या यात्रेमुळे गत इतिहासाचे स्मरण होते. हे गडकोट शिवराय आणि त्यांचे सहकारी यांनी आपल्यासाठी एक अमूल्य ठेवा म्हणून ठेवले आहे.
