belgaum-khanapur-road-accident-two-death-katagali-village-202011.jpg | बेळगाव : खानापूर मार्गावर अपघातात बहिण-भाऊ जागीच  ठार | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : खानापूर मार्गावर अपघातात बहिण-भाऊ जागीच ठार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. खानापूर : बेळगाव - खानापूर मार्गावरील काटगाळी गावानजीक कमल नगर येथे डंपर आणि दुचाकीच्या अपघातात बहिण-भाऊ दोघे जण जागीच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (13 नोव्हेबर) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. रेणुका रमेश यग्गुर (वय 28, रा. रायापूर नंदगड) आणि कमलेश करेप्पा करवी (वय 25) या बहीण-भावाचा मृत्यू झाला.
हे दोघेही देसुर डेपोच्या ठिकाणी चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून सेवा करीत होते. आज शुक्रवारी सकाळी बहिण-भाऊ दुचाकीवरून देसुरकडे कामाला निघाले होते. डंपरला ओव्हरटेक करून जाण्याच्या प्रयत्नात दुचाकी या अवजड वाहनांच्या खाली आली. त्यामध्ये दोघांचाही गाडीखाली चिरडून मृत्यू झाला. रेणुकाचा विवाह झाला होता. तिच्या पश्चात पती आणि दोन मुले आहेत.