school-children-mask.jpg | अनलॉक 5 : शाळा-महाविद्यालये उघडण्याचा निर्णय राज्यांचा Unlock 5 30 नोव्हेंबरपर्यंत | belgaum news | belgavkar बेळगावकर

अनलॉक 5 : शाळा-महाविद्यालये उघडण्याचा निर्णय राज्यांचा Unlock 5 30 नोव्हेंबरपर्यंत

belgavkar.com | belgaum | belgavkar

केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवारी अनलॉक 5 च्या गाइडलाइन्स 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. परिणामी, ज्या प्रमाणे ऑक्टोबरमध्ये शाळा-महाविद्यालयांबाबत निर्णय घेण्यात आला होता, तोच नोव्हेंबर महिन्यातही कायम राहणार आहे. म्हणजेच, शाळा-महाविद्यालये सुरू करण्यास केंद्र सरकारची परवानगी आहे, मात्र राज्यांनी आपापल्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार याबाबतचा निर्णय घ्यायचा आहे. राज्यांतर्गत व्यक्ती आणि वस्तूंच्या वाहतुकीवर कोणतीही बंधने नसणार आहेत, असं गाइडलाइन्समध्ये म्हटले आहे. मात्र कंटेन्मेंट झोनमध्ये 30 नोव्हेंबरपर्यंत कडक लॉकडाऊन असेल. तसेच कोणतेही राज्य सरकार किंवा केंद्र शासित प्रदेश कंटेन्मेंट झोनच्या बाहेर, केंद्राच्या सल्लामसलतीशिवाय, परस्पर स्थानिक लॉकडाऊन करू शकणार नाही, असेही या मार्गदर्शक तत्त्वांध्ये म्हटले आहे.
Unlock 5.0 ची मुदत 30 नोव्हेंपर्यंत वाढली, जाणून घ्या नवे नियम
राज्यांमध्ये मेट्रो, शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, हॉस्पिटॅलिटी सर्व्हिस, धार्मिक स्थळे, योगा आणि अन्य प्रशिक्षण संस्था, जीम, थिएटर आणि मनोरंजन पार्क उघडण्यास परवानगी आहे. शाळांच्या बाबतीतला निर्णय मात्र राज्य सरकाने घ्यावयाचा आहे.
कर्नाटकात शाळा कधी...? दिवाळीपर्यंत तरी शाळा सुरु करण्याबाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. शाळा सुरू झाल्या तरी प्राधान्याने दहावी, बारावीच्या वर्गांचा विचार होईल, असे शालेय शिक्षणमंत्री यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोनाची साथ (Coronavirus) अजुन संपलेली नाही त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटलं आहे. प्रतिबंधीत क्षेत्रात कडक लॉकडाऊन सुरूच असेल असही केंद्रीय गृहमंत्रालयाने (Ministry of Home Affairs (MHA) ) म्हटलं आहे.

Unlock-5.0 नागरीकांनी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं असं आवाहनही सरकारने केलं आहे. काही राज्यांमध्ये मंदिरं खुली करण्यात आली आहेत. त्याचबरोबर शाळा सुरू करण्यासही परवानगी दिली आहे. मात्र महाराष्ट्रात सरकारने मंदिरं सुरू करण्याला अजुनही परवानगी दिलेली नाही.