hukkeri-police-belgaum-arrested-three-vehicle-robbery-vehicles-seized-202010.jpg | बेळगाव : 3 दुचाकी चोरट्यांना अटक; 13 दुचाकी जप्त | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : 3 दुचाकी चोरट्यांना अटक; 13 दुचाकी जप्त

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : जिल्ह्यात विविध ठिकाणी दुचाकी आणि त्यांचे सुटे भाग विक्री करणाऱ्या तीन चोरट्यांना हुक्केरी पोलिसांनी अटक केली आहे. अटकेतील आरोपींकडून 6.24 लाख रुपये किंमतीच्या 13 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. दाऊद खुदासाब सरकावास (रा. चिमडगी, ता. जमखंडी) आणि महेश बसाप्पा मगदूम (रा. सावळगी, सध्या रा. कल्लोळ) या दोघांना या प्रकरणी अटक झाली आहे. आरोपीना अटक करुन त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. या प्रकरणातील फरारी असलेला मुख्य संशयित आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
हुक्केरी सीपीआय गुरुराज कल्याणशेट्टी यांनी गाडीवर नंबर प्लेट नसताना पल्सर गाडीवरील दोघांना पकडले होते. याप्रकरणी चौकशीचे आदेश पीएसआय शिवानंद गुडगनट्टी आणि सहकाऱ्यांनी दिले होते. त्याची कसून चौकशी केली असताना ते दुचाकी चोर असल्याचे निष्पन्न झाले. तसेच आणखी एका प्रकरणात शिवानंद महादेव चौगुला (रा. बेनवाड, सध्या रा. गांधीनगर हुक्केरी) याला दुचाकी चोरी प्रकरणी अटक केले आहे. त्यांच्याकडून 6.24 लाख रुपये किंमतीच्या 13 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. यापैकी मुख्य आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.