Liquor-Beer.jpg | बेळगाव : सलग 3 दिवस मद्यविक्रीवर बंदी | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : सलग 3 दिवस मद्यविक्रीवर बंदी

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : 30 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबरपर्यंत मद्यविक्रीवर निर्बंध (liquor sale banned) लागू करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी हा आदेश बजावला आहे. वाल्मिकी जयंती, ईद-ए-मिलाद आणि कर्नाटक राज्योत्सवामुळे हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
शुक्रवार 30 ऑक्टोबर सकाळी 6 पासून सोमवार 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 पर्यंत सलग तीन दिवस मद्य विक्री बंद राहणार आहे. याची नोंद सर्व विभागातील मद्य विक्री व्यावसायिकांनी घ्यावी आणि नियमांचे पालन करावे असे या आदेशात म्हटले आहे.