belgaum-khanapur-taluka-hebbal-village-youth-accident-death-yash-deshpande-202010.jpg | बेळगाव : अपघातात टिळकवाडीच्या युवकाचा मृत्यू | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : अपघातात टिळकवाडीच्या युवकाचा मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : हेब्बाळ (ता. खानापूर) जवळ झालेल्या मोटार सायकल अपघातात हिंदूनगर, टिळकवाडी येथील एका युवकाचा मृत्यू झाला. शनिवारी (24 ऑक्टोबर) सायंकाळी ही घटना घडली असून नंदगड पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे. यश परेश देशपांडे (वय 20) असे त्या दुर्दैवी युवकाचे नाव असून त्याच्या पश्चात आई, वडिल, आजी, आजोबा असा परिवार आहे. दि. 24 ऑक्टोबर रोजी मोटार सायकलवरुन पडून हा तरुण गंभीर जखमी झाला होता.
त्याला उपचारासाठी बेळगाव शहरातील एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. उपचाराचा उपयोग न होता रविवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. नंदगड पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली असून खानापूरचे मंडल पोलीस निरीक्षक सुरेश शिंगी पुढील तपास करीत आहेत.